23 हजारांचे झाडू, एकाच कामाची दोनदा बिले

23 हजारांचे झाडू, एकाच कामाची दोनदा बिले
श्रीरामपूर पालिका इमारत

श्रीरामपूर : नगरपालिकेने एका इलेक्ट्रिक दुकानातून २३ हजार रुपयांचे झाडू खरेदी केल्याचे उघडकीस आल्याने मुख्याधिकारी व दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह काँग्रेसच्या नगरसेवकांनी दिला.

नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आॅनलाईन पद्धतीने आयोजित केली होती. मात्र, विरोधी नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष ससाणे यांच्या नेतृत्वाखाली निषेध करुन सभात्याग केला. त्यानंतर शहरातील सुयोग मंगल कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, नगरसेवक संजय फंड, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, शहराध्यक्ष संजय छल्लारे, नगरसेवक मुजफ्फर शेख, नगरसेविका भारती परदेशी, आशा रासकर, मीरा रोटे, दिलीप नागरे, मनोज लबडे उपस्थित होते. Corporator aggressive in Shrirampur Municipality

श्रीरामपूर पालिका इमारत
लग्नकल्लोळ! सुहागरात्री बाहेरून कडी लावून पळालेल्या वधूला अटक

ससाणे म्हणाले, ‘‘शहरातील एकाच प्रभागातील कामांची दोन बिले नगरपालिकेने संबंधित ठेकेदाराला दिली. स्मशानभूमीमध्ये एका कामगाराला प्रत्येक महिना २६ हजार रुपये वेतन दिल्याची खर्चात नोंद आहे. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांच्या हातात केवळ सहा हजार रुपये मिळतात. त्यामुळे उर्वरित २० हजारांची रक्कम कुणाच्या खिशात गेली, त्याचा शोध घेणे गरजेचे आहे. अशा बोगस बिलांची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.’’ शहरातील प्रत्येक कामांची मुख्याधिकारी व अभियंत्यांसमवेत प्रत्यक्ष फिरून पाहणी करणार असल्याचे ससाणे यांनी स्पष्ट केले. Corporator aggressive in Shrirampur Municipality

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी पालिकेत विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी २४ नगरसेवकांनी केली होती. परंतु नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी ऑनलाईन सभा घेतली. त्यात प्रामुख्याने महाराजांच्या पुतळ्याचा विषय देखील घेतला नाही. तसेच कोरोनाचे कारण पुढे करत नगरपालिकेची सभा ऑनलाइन घेऊन सत्ताधारी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष कांबळे यांनी केला.

विरोधकांचे आरोप बिनबुडाचे ः आदिक

नगरसेवकांनी बहुमताने संमती दर्शविल्याने सभा ऑनलाईन घेऊन सर्व विषयांना मंजुरी दिली. विरोधकांनी बिलासंदर्भात केलेल्या आरोपांबाबत आपण स्वतः सहा जुलै रोजी मुख्याधिकारी यांना आक्षेप असलेल्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करुन काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत, अशी टीका नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी पत्रकारद्वारे केली.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com