अंबड पोलीस ठाण्यातील लाचखोर पीएसआय आणि शिपाई गजाआड

अंबड पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्याला पकडल्याने पोलीस दलात मोठी खळबळ
अंबड पोलीस ठाण्यातील लाचखोर पीएसआय आणि शिपाई गजाआड
अंबड पोलीस ठाण्यातील लाचखोर पीएसआय आणि शिपाई गजाआड अभिजीत सोनावणे

नाशिक - दुकानदार महिलेवर खोटा गुन्हा दाखल करुन तिला जामीन मिळाल्यावर 10 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या अंबड पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून कारवाई केली आहे. पोलीस उपनिरीक्षक कैलास सोनवणे आणि पोलीस शिपाई दीपक वाणी अशी या दोघा लाचखोर पोलिसांची नावं आहेत.

हे देखील पहा -

गेल्या 2 दिवसांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग विविध तक्रारीवर कारवाई करत असून गेल्या दोन दिवसात लाचलुचपतने तीन कारवाया करत लोकसेवकांना लाच घेताना पकडले आहे. दरम्यान अंबड पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्याला पकडल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

अंबड पोलीस ठाण्यातील लाचखोर पीएसआय आणि शिपाई गजाआड
राज्यातल्या ३२ जिल्ह्यातील नगर पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर...

तक्रारदार महिलेचे सिडको भागात कापड विक्रीचे दुकान आहे. तिच्यावर उपनिरीक्षक सोनवणे आणि शिपाई वाणी यांनी कठोर कारवाई करण्याची धमकी दिली होती. तसेच ती न्यायालयातून जामिनावर सुटताच या लाचखोरांनी तिच्याकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती १० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर बुधवारी सायंकाळी सापळा रचून या दोघांना लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com