बुलढाण्यात दोन बोकडांची जोरदार चर्चा; दोघांनाही लाखोंची किंमत..!

बकरी ईदच्या पर्वावर बोकडयाची वाढली मागणी आहे.
बुलढाण्यात दोन बोकडांची जोरदार चर्चा; दोघांनाही लाखोंची किंमत..!
बुलढाण्यात दोन बोकडांची जोरदार चर्चा; दोघांनाही लाखोंची किंमत..!संजय जाधव

संजय जाधव

बुलढाणा : बोकड कुर्बानीला बकरी ईद वेळेस खुप महत्व असते. त्यातच एखाद्या बोकडयावर अल्लाह लिहिलेले किवा ईदिची चंद्रकोर असे चिन्ह दिसत असेल अश्या बोकड़याना खुप महत्व प्राप्त होत असत. अश्याच बोकडयाची चर्चा सध्या बुलढाणा जिल्ह्यात होत आहे. Cost of two goats are in millions of rupees in buldhana

हे बोकड चिखली तालुक्यातील करवंड या गावातील आहे. या बोकडाची जोरदार चर्चा रंगली आहे कारण या बोकडाची खासियतच तशी आहे, त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक बाजारात सध्या लाखोंची बोली यावर लावली जात आहे.

हे देखील पहा-

टायगर नावाच्या या बोकडाला गेल्या आठवडाभरापासून पाहण्यास ग्रामस्थच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक जण गर्दी करत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील करवंड गावचा उंच पुरा गडी, मोठं कपाळ. मजबूत बांधा जणू काही रोजच जिममध्ये जातो ! ताकदीने एवढा मजबूत की दोन तीन जण फक्त त्याला पकडण्यासाठी लागतात. मात्र या टायगवर लाखोंची बोली लागण्याच कारणच वेगळ आहे. ते म्हणजे याच्या पाठीवर जन्मतः "अल्लाह" उमटलेल आहे ! त्यामुळे जाणकार अस सांगतात की ज्यांच्याकडे असे जनावरे आढळतात त्यांना नशिबवान मानलं जात

जसजस लोकांना याबद्दल माहिती होऊ लागली तसतशी याची किंमत लाखोंच्या घरात पोहोचली आहे. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 36 ते 51 लाखांपर्यंत याची मागणी झाली आहे ! परंतु आपल्या बोकडाला जवळपास 1 कोटींपर्यंत किंमत मिळावी अशी अपेक्षा मालकाची आहे.

लखपती असलेला हा टायगर आता नेमका कितीची मजल गाठतो हे पाहणं उत्सुकाच आहे..

बुलढाण्यात दोन बोकडांची जोरदार चर्चा; दोघांनाही लाखोंची किंमत..!
बुलढाण्यात दोन बोकडांची जोरदार चर्चा; दोघांनाही लाखोंची किंमत..!संजय जाधव

तर दुसरीकडे दुसरा बोकड आहे. मेहेकर तालुक्यातील डोनगाव मधील. याचे नाव खंड्या असून तोही बोकड मजबूत असून त्याचा खुराक सुद्धा तसेच आहे. दररोज ढ़ेप, केळी, भाजीपाला अस दोन वर्षापासून त्याची काळजी घेतली जात आहे. अश्या बोकडयाला पाहायला आजुबाजुच्या जिल्ह्यातील असंख्य लोक व व्यापारी येत आहेत.

बुलढाण्यात दोन बोकडांची जोरदार चर्चा; दोघांनाही लाखोंची किंमत..!
एसीबी करणार परमबीर सिंगविरोधात खुली चौकशी; गृहविभागाची परवानगी

जिल्ह्यातील प्रत्येक बाजारपेठेत त्या बोकडाला विकायला घेऊन जात, तिथे त्याची बोली सुद्धा लाखो रुपया पासून सुरुवात होत असे. तब्बल 4 ते 10 लाख रुपयांपर्यंत बोली लागते. त्याचे सुद्धा कारण बोकडयाच्या कपाळावर चंद्रकोर आहे. त्यांमुळे बकरी ईदिला कुर्बान देण्यासाठी बोकडची मागणी वाढली आहे

येत्या 22 तारखेला बकरी ईद आहे. या बकरी ईदिला हे दोन बोकड किती रूपयाला विकल्या जातात याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com