Cotton Price Maharashtra: शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी; कापसाचा भाव पुढच्या काही दिवसांत वाढणार का?

Maharashtra Cotton Price: आज ना उद्या कापसाचे भाव वाढतील आणि आपल्या डोक्यावरील कर्जाचं ओझं कमी होईल, या आशेने आजवर अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला आहे.
Cotton Price Today Maharashtra
Cotton Price Today MaharashtraSaam TV

Cotton Price Today Maharashtra: अवकाळी पाऊसासह गारपीटीने त्रस्त होऊन बसलेल्या शेतकऱ्यांना अजूनही कापसाचा भाव वाढेल अशी आशा आहे. मात्र गेल्या ३ महिन्यांपासून महाराष्ट्रात कापसाचा भाव ९ हजारांच्या पार गेला नाही. कापसाचा हंगाम सुरू होताच, सुरूवातीचे काही दिवस बाजारपेठेत कापसाला ८ हजार ६०० ते ८ हजार ७०० रुपयांपर्यंत भाव मिळत होता. मात्र, दिवाळी आली अन् कापसाचे भाव गडगडले.

आज ना उद्या कापसाचे भाव वाढतील आणि आपल्या डोक्यावरील कर्जाचं ओझं कमी होईल, या आशेने आजवर अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला आहे. बाजारपेठेत कापसाला हवा तसा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अन्न पाणीही गोड लागेनासं झालंय. त्यातच वाढत्या तापमानामुळे कापसाच्या वजनातही घट होत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची धाकधूक वाढत आहे. (Latest Marathi News)

Cotton Price Today Maharashtra
Jio Recharge Plan: जिओचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन; अनलिमिटेड कॉलिंगसह दिवसाला 2GB डेटा, जाणून घ्या काय आहे ऑफर

आधीच अवकाळी पाऊस, सातत्याने होणाऱ्या गारपीटीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला रब्बी पिकाचा घास हिरावून गेल्याने बळीराजाला अश्रू अनावर झाले आहेत. एकीकडे बाजारपेठेत कापसाला (Cotton Price) मिळणारा कमी भाव आणि दुसरीकडे निसर्गाच्या कोपामुळे महाराष्ट्रातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

गारपीट आणि अवकाळी पावसाने हैराण होऊन बसलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. मागील तीन-चार दिवसांपासून बाजारात कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत होती. मात्र, आता आज त्यात मोठी वाढ झाली आहे. कापसाच्या दरात वाढ झाल्याचं कळताच अनेक शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

विदर्भात कापसाचा भाव काय?

मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात कापसाचे पिक घेतले जाते. विदर्भातील (Akola) अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीला कापसाची पंढरी म्हणून ओळखलं जातं. या बाजार समितीत मिळणाऱ्या कापसाच्या भावाकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लक्ष लागून असतं. मात्र, अकोट बाजार समितीत सुद्धा कापसाला प्रतिक्विंटल ८ हजार ३०० ते ८ हजार ४०० रुपयांपर्यंतच भाव मिळत आहे.

Cotton Price Today Maharashtra
Vande Bharat Accident: वंदे भारत एक्स्प्रेसच्या धडकेत गाय हवेत उडाली, शौचास बसलेल्याच्या अंगावर पडली; दोघांचा मृत्यू

मराठवाड्यात कापसाचा भाव काय?

एकीकडे अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती कापसाला ८ हजार ४०० रुपयांपर्यंतचा भाव मिळत असला, तरी दुसरीकडे मराठवाड्यात मात्र, कापसाचे भाव ८ हजारांच्या आतच असल्याचं दिसून येत आहे. मराठवाड्यातील छत्रपतीसंभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात कापसाला ७ हजार ८०० ते ७ हजार ९०० रुपयांपर्यंतचा भाव मिळतो. (Breaking Marathi News)

गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात कापसाचा भाव जवळपास ११ हजारांपर्यंत गेला होता. त्यामुळे यावर्षी सुद्धा कापसाला भाव मिळेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा वाढवला. त्यातच महागड्या औषधांची देखील फवारणी केली. उत्पन्न जास्त काढता यावं, यासाठी रासायनिक खतेही मोठ्या प्रमाणात टाकली. मात्र, इतका खर्च करूनही यावर्षी कापसाला प्रतिक्विंटल ९ हजारही भाव मिळेनासा झाला आहे.

कापसाचे भाव वाढणार का?

कापसाचे दर जरी पुन्हा वाढतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी (Farmers) घाबरु नये, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी वर्तवला आहे. जरी भाव वाढले नाही, तरी कापसाचा भाव ८ हजारांच्या खाली जाणार नाही, असं अभ्यासकांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांनी विक्री मर्यादीत ठेवल्यास कापसाचा भाव लवकच वाढेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळं शेतकऱ्यांनी ८ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी दरात कापूस विकू नये. मार्च महिन्याच्या सुरूवातीलपर्यंत कापसाची सरासरी दरपातळी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com