Washim: जिल्ह्यातील मानोरा नगर पंचायतच्या 17 जागांची आज मतमोजणी

सकाळी 10 वाजता पासून मतमोजणीला होणार सुरुवात...
Washim Election
Washim Electionगजानन भोयर

वाशिम - जिल्ह्यातील मानोरा नगर पंचायतच्या 17 जागांसाठी 7,790 मतदारांपैकी 5,702 मतदारांनी मतदान (Election) केलं असून मतदानाची टक्केवारी 73.19 टक्के आहे. निवडणूक निकालासाठी एकूण 5 टेबल असून मतमोजणीच्या 4 फेऱ्या होणार आहेत. सकाळी 10 वाजता पासून मतमोजणीला सुरुवात होईल. 17 जागांसाठी एकूण 77 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम (EVM) मध्ये बंद असून निकाला नंतर आपल्या मताचे दान मतदाराने कुणाला दिले ते स्पष्ट होणार आहे. मुंगसाजी भवन मध्ये प्रशासनाने मत मोजणीची पूर्ण तयारी केली आहे. मतमोजणी दरम्यान मोठा पोलीस (Police) बंदोबस्त लावण्यात आला आहे.

हे देखील पहा -

सर्वच पक्षांनी स्वतंत्र उमेदवार उभे केल्यामुळं मानोरा नगर पंचायत मध्ये नेमकं चुरशीच्या लढती झाल्या आहेत. कोणता पक्ष नगर पंचायत वर आपली सत्ता स्थापन करणार हे निकालानंतर समोर येणार आहे. मानोरा नगर पंचायतच्या 13 जागांसाठी 21 डिसेंबर ला मतदान पार पडलं असून चार जागांसाठी 18 जानेवारी ला मतदान झालं आहे. या सर्व जागांची मतमोजणी आज 19 जानेवारी ला होत आहे.

Washim Election
Pune: शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळ्याची व्याप्ती वाढली

वार्ड नुसार मुख्य लढत...

वार्ड क्रं.1) वंदना संजय रोठे - काँग्रेस ,रेखा शामराव पाचडे. राष्ट्रवादी.

वार्ड क्रं. 2) सुमनबाई शामराव चित्तळकर - काँंग्रेस,गणेश प्रल्हाद वाघमारे - राष्ट्रवादी काँंग्रेस, प्रताप ऐसराम डांगे- भाजपा.

वार्ड क्रं. 3) उमा किशोर पांडिया - अपक्ष,शेख फारुक - राष्ट्रवादी काँंग्रेस, रत्नमाला दिक्षित - भाजपा.

वार्ड क्रं. 4) अंजुम अंजार पटेल - काँग्रेस, शिला गजानन सातरोठे - शिवसेना.

वार्ड क्रं. 5) ताई पांडूरंग सिरसाठ - राष्ट्रवादी, रुपेश पारडे- काँंग्रेस, ज्ञानेश्वर विठ्ठल गोतरकर- भाजपा.

वार्ड क्रं. 6) अरुण राधाकिसन हेडा - राष्ट्रवादी,अभिषेक चव्हाण - भाजपा,संजय रोठे - काँग्रेस.

वार्ड क्रं.7 ) कविता अरुण राठोड- अपक्ष,इंद्रजित शेरसिंग जाधव - राष्ट्रवादी.

वार्ड क्रं. 8) कृती इम्रान पोपटे- राष्ट्रवादी, सारिका अनिल कंठाळे- शिवसेना.

वार्ड क्रं. 9) संजय नारायण भोरकडे - राष्ट्रवादी, गणेश परशराम भोरकडे- काँंग्रेस.

वार्ड क्रं. 10) शहा एहफान शहा महेनुद शहा - राष्ट्रवादी,तायडे गणेश अशीम - भाजपा,अनजार अहमद अहेमदयार - काँंग्रेस.

वार्ड क्रं. 11) रुख्मीनाबानो इम्रानखान - काँग्रेस,सुन्हेश परवीन वहिदेतन - राष्ट्रवादी.

वार्ड क्रं. 12) शहा अमिनाबी हनिफ शहा - अपक्ष,सुरसीदुबी अब्दुल शहीद- काँग्रेस,रेखा संतोष मात्रे - राष्ट्रवादी.

वार्ड क्रं. 13) धात्रे सरस्वती प्रकाश - भाजपा, वाळले पल्लवी मिथून -काँग्रेस,म्हातारमारे ज्योती राजेंद्र - राष्ट्रवादी.

वार्ड क्रं. 14) शहा निसार शहा जबार शहा - राष्ट्रवादी,हफीस खान हमीद खान - काँग्रेस.

वार्ड क्रं.15) शहा रिजवान शहा जमील शहा - राष्ट्रवादी,रशीद खान हमीद खान - काँग्रेस.

वार्ड क्रं. 16) शुभांगी प्रशांत सराटे - राष्ट्रवादी,सुशीला विजय भगत - काँग्रेस.

वार्ड क्रं. 17) हेमेंद्र राजेश्वर ठाकरे- राष्ट्रवादी,रामेश्वर विजय जैस्वाल - शिवसेना,अहेमद बेग - काँग्रेस.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com