औरंगाबादमध्ये खळबळ! हॉटेलच्या रुममध्ये आढळले प्रेमीयुगुलांचे मृतदेह

औरंगाबादमध्ये येथे खळबळ माजवणारी घटना उघडकीस आली आहे.
Aurangabad vedantnagar police station
Aurangabad vedantnagar police stationsaam tv

औरंगाबादमध्ये : येथे खळबळ माजवणारी घटना उघडकीस आली आहे. एका हॉटेलच्या रुममध्ये प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळल्याचा (Aurangabad crime update) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील हॉटेल पंजाब मध्ये हे दोघे जण एकाच रुममध्ये २९ जुलैपासून राहत होते. काल मंगळवारी रात्री उशीरा दोघेही रुममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

Aurangabad vedantnagar police station
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराचे ठरले; पाहिल्या टप्प्यात BJP - शिंदे गटाला किती मंत्रिपदे?

सागर राजेंद्र बावणे आणि सपना अंकुश खंदारे अशी मृतांची नावं आहेत. याप्रकरणी वेदांत नगर पोलीस (Police) पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादमध्ये स्टेशन रोड परिसरातील हॉटेल पंजाब मध्ये एक प्रेमीयुगुल मागील सहा दिवसांपासून राहत होते. परंतु, काल रात्री हे दोघेही बेशुद्ध झाल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Aurangabad vedantnagar police station
Uddhav Thackeray | शिंदे सरकारच्या 'त्या' निर्णयानंतर शिवसेना सावध; ठाकरेंनी बोलावली तातडची बैठक

परंतु, उपचाराआधीच त्यांच्या मृत्यू झाला होता. औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरात राहणारी सपना अंकुश खंदारे आणि सिडको भागातील सागर राजेंद्र बावणे या दोघांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोघांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे, याचा वेदांत नगर पोलीस तपास करत आहेत.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com