नवदाम्पत्याचा संसाराचा प्रवास 'त्या' रस्त्यावर कायमचा थांबला, कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर

सिल्लोड तालुक्यातील पारोळा-डोईफोडा फाट्यावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला.
Siilod accident update
Siilod accident updatesaam tv

नवनीत तापडीया

सिल्लोड : तालुक्यातील पारोळा-डोईफोडा फाट्यावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात (car and bike accident) झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या जीपने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या दाम्पत्याचा दुर्देवी मृत्यू झाला. दुर्गाबाई आणि सागर ईश्वर सपकाळ अशी मृतांची नावं आहेत. हे दाम्पत्या सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथे राहत होते. हा अपघात इतका भीषण होता की, सागर सपकाळचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी दुर्गाबाई यांचा (couple death) औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच कारमध्ये असलेल्या सुनीता मूनसिंग सीसोरिया गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुनीता सीसोरिया बऱ्हाणपूर येथील खातळगडच्या रहिवासी आहेत.

Siilod accident update
वारकरी संप्रदायात खळबळ! पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड, देहू संस्थानच्या विश्वस्तांसह २९ जणांना अटक

सागर सपकाळ व दुर्गाबाई हे पती-पत्नी दुचाकीवरून सिल्लोड येथून कन्नडकडे जात होते. तर देऊळगाव बाजारकडून एक जीप सिल्लोडकडे जात होती.पिरोळा-डोईफोड़ा फाट्याजवळ भरधाव वेगातील जीपने सपकाळ दाम्पत्याच्या दुचाकीला उडवले. यात सागर सपकाळ जागीच ठार झाले. तर पत्नी दुर्गाबाई सपकाळ गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तात्काळ नागरिकांनी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Siilod accident update
Chandrapur News : १० वर्षाच्या मुलाने केला स्वत:च्या अपहरणाचा बनाव; कारण ऐकून पोलिसही चक्रावले!

सागर व दुर्गाबाई यांचे अवघ्या दीड महिन्यापूर्वी लग्न झाले होते. पतीपत्नी म्हणून नवीन जीवनाची सुरुवात त्यांनी केली. मात्र,काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. सागरवर मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर बुधवारी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला.यामुळे बोदवड गावावर शोककळा पसरली आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com