प्राचार्या सुरेखा राठोड खून प्रकरणातील दोघांची निर्दोष मुक्तता

प्रा. सुरेखा राठोड यांचा गळा चिरुन खून करण्यात आला होता. या खून प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. त्यात अटक मात्र तीन लोकांना झाली होती.
प्राचार्या सुरेखा राठोड खून प्रकरणातील दोघांची निर्दोष मुक्तता
खून प्रकरणातील दोघांची निर्दोष मुक्तता

नांदेड : किनवट शहरात एका महिला प्राचार्याचा गळा चिरुन खून सन 2018 मध्ये करण्यात आला होता. या प्रकरणात तीच्या पतीसह पाच जणांवर खूनाचा गुन्हा किनवट पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन सुरेखाच्या पतीसह तिघांना अटक केली होती. यातील दोघेजण अद्यापही फरार आहेत. या प्रकरणातील एकाला जिल्हा न्यायाधीश के. एन. गौतम यांनी तर दुसऱ्या एका महिलेला उच्चन्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. मयत सुरेखा राठोड हिचा पती अजूनही कारागृहात आहे.

प्रा. सुरेखा राठोड यांचा गळा चिरुन खून करण्यात आला होता. या खून प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. त्यात अटक मात्र तीन लोकांना झाली होती. दोन फरार या सदरात दाखवून दोषारोपपत्र दाखल झाले होते. त्यातील पती- पत्नी असणाऱ्या दोन जणांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. दोषमुक्तीच्या आदेशात न्यायालयाने पोलीसांच्या तपासाचा खरपूस समाचार घेतला आहे.

हेही वाचा - बेशिस्तपणे पार्किंग..रिक्षाचालकांविरोधात कारवाईचा बडगा; पाच रिक्षा ताब्‍यात

ता. 23 ऑक्टोबर 2018 रोजी किनवट शहरात प्राचार्या सुरेखा राठोड यांचा गळा चिरुन खून करण्यात आला. सुरुवातीच्या काळातील पुरावे जमा करणे, तक्रार दाखल करणे, पंचनामे करणे आणि साक्षीदार जमवणे यामध्ये पोलिस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. आपली बहिण सुरेखा राठोड हिचा खून झाल्याची तक्रार तिचा भाऊ विलास दामोधर राठोड याने दिली होती. त्यात प्राचार्य सुरेखा राठोड यांचा पती विजय टोपा राठोड, अजय असोलेकर, वैशाली शेषराव माने, तिचा नवरा प्रा. शेषराव सुभाष माने यांना आरोपी करण्यात आले होते. त्या गुन्ह्याचा क्रमांक 191/2018 असा होता.

या प्रकरणात पोलिसांनी भारतीय दंडसंहितेची विविध कलमान्वये दोषारोपपत्र दाखल केले. अटक झाली तेंव्हा वैशाली माने ह्या गर्भवती होत्या. जिल्हा न्यायालयात सत्र खटला क्रमांक 137/2018 मध्ये दोन वेगवेगळ्या अर्जांनुसार शेषराव सुभाष माने आणि वैशाली शेषराव माने यांना आपल्याला दोषमुक्त करण्याची मागणी केली. यामध्ये दुसरे अतिरित सत्र न्यायाधीश के. एन. गौतम यांनी शेषेराव सुभाष मानेला दोषमुक्त केले. हा आदेश लिहितांना न्यायालयाने पोलीसांनी वैध वैज्ञानिक प्रयोग शाळेतील पुरावा, वैद्यकीय पुरावा, थेट अथवा परिस्थितीजन्य पुरावा असा कोणताच अभिलेख या संदर्भाने तयार केला नाही. सोबतच कलम 201 चे पुरावेत तर मिळतच नाहीत. कलम 216 चे पुरावे सुध्दा दोषारोपपत्रात दिसत नाहीत अशी नोंद करून शेषराव सुभाष मानेला दोषमुक्त केले होते. त्यासोबतच वैशाली शेषराव मानेचा स्वतंत्र अर्ज मात्र फेटाळण्यात आला होता.

येथे क्लिक करा - म्हणून, तृतीय पंथीयाने 3 महिन्याच्या चिमूकलीला खाडीत पूरलं

वैशाली मानेने या निकालाविरुध्द उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयातील न्यायमुर्ती आर. जी. आवचट यांच्या समक्ष या प्रकरणाची सुनावणी झाली. आपला निकाल देतांना न्यायमुर्तींनी फौजदारी प्रक्रिया संहितेतील दोषारोप मुक्तीचे कलम 227 लिहिले आहे. सोबतच सर्वोच्च न्यायालयातील योगेश उर्फ सचिन जगदीश जोशीविरुध्द महाराष्ट्र शासन या निर्णयाचा उल्लेख केला. वैशाली माने बाबत लिहितांना न्यायालयाने अनेक साक्षीदारांचे नाव नमुद करुन त्यांनी दिलेल्या साक्षीत काय आहे याचा उल्लेख केला आहे. उच्च न्यायालयाला सुध्दा याप्रकरणात वैशाली मानेने प्राचार्य सुरेखा राठोड यांचा खून केल्याचे पुरावे उपलब्ध नसल्याची नोंद करत वैशाली मानेला सुध्दा सुरेशा राठोडच्या खून प्रकरणातून मुक्त केले आहे. उच्च न्यायालयात या प्रकरणी वैशाली मानेची बाजू अॅड. सतेज जाधव यांनी मांडली त्यांना अॅड. एम. ए. ग्रंथी यांनी सहकार्य केले.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com