आईचा खून करुन काळीज खाणा-यास न्यायालयाने सुनावली फाशी

आईचा खून करुन काळीज खाणा-यास न्यायालयाने सुनावली फाशी
Sunil Kuchkorvi Kolhapur

कोल्हापूर : दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून आईचे तुकडे करून काळीज खाण्याचा प्रयत्न करणा-यास कोल्हापूर kolhapur जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कावळा नाका kavla naka येथील माकडवाला वसाहतीत सुनील कुचकोरवी हा राहतो. त्याने २८ ऑगस्ट २०१७ रोजी आईने दारूला पैसे दिले नाहीत म्हणून तिचा तुकडे करून निघृण खून केला. त्याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. (court-order-hang-till-death-to-kolhapur-youth-who-killed-mother-crime-news)

याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी केला. या खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायाधीश (वर्ग ४) महेश जाधव यांच्या न्यायालयात पार पडले. सरकार पक्षातर्फे विवेक शुक्ल यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने सुनीलला दोषी ठरवले.

Sunil Kuchkorvi Kolhapur
'कृष्णा'च्या निवडणुकीत प्रशासनाचा हलगर्जीपणा? क-हाडकर चिंतेत

त्याला जन्मठेप की फाशीची शिक्षा याबाबत दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाला होता. न्यायालयाने सुनीलचे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे असल्याचे नमूद करून आज (गुरुवार) त्याला फाशीची शिक्षा सुनावली. कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिलीच फाशीची शिक्षा ठरल्याची चर्चा आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com