अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; साेनगावातील युवकास सक्तमजुरी

जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.के.पटणी यांनी संदीप देशमुख यास ही शिक्षा सुनावली आहे.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; साेनगावातील युवकास सक्तमजुरी
Court Order

सातारा : साेनगाव (ता. जावळी) येथील संदीप देशमुख यास सातारा जिल्हा न्यायालयात सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ही शिक्षा झालेली आहे. court orders ten years improsinment jawali sonagoan satara youth

Court Order
बाडग्यांनाे! जेल तुमच्या बापाचं आहे का? संजय राऊत

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात २०१६ मध्ये अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली होती. या घटनेत अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने तिची प्रसूती झाली होती. याप्रकरणी संदीप तानाजी देशमुख याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला हाेता.

सातारा जिल्हा न्यायालयात नुकतेच संदीप देशमुख यास दहा वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.के.पटणी यांनी संदीप देशमुख यास ही शिक्षा सुनावली आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com