Nagpur : स्वत:च्या काेवळ्या मुलींवर लैंगिक अत्याचार; नराधम बापास दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

न्यायालयात गुरुवारी झाली अंतिम सुनावणी.
nagpur, court
nagpur, courtsaam tv

Nagpur : नागपूर विशेष सत्र न्यायालयाने (Nagpur Court) एका नराधम बापाला (father) दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बायकोच्या (wife) निधनानंतर स्वतःच्या दोन अल्पवयीन मुलींवर (girls) त्याने दीड वर्ष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली हाेती. या प्रकरणात न्यायालयाने (court) ही शिक्षा सुनावली आहे.

nagpur, court
Nagpur : मोमीनपुरा परिसरात तलवार नाचविल्याप्रकरणी सहा युवकांना अटक

सरकारी वकील रश्मी खापर्डे यांनी दिलेल्या माहितीनूसार आराेपीची पत्नी गर्भवती असताना सन २०१९ कालावधीत मरण पावली. त्यावेळी त्याची मोठी मुलगी १४ वर्षे तर लहान मुलगी १२ वर्षाची होती.

पत्नीच्या मृत्यूनंतर माेमीनपूरा परिसरातील रिक्षा व्यवसाय करणा-या बापाने त्याच्या दोन्ही मुलींवर वाईट नजर टाकायला सुरुवात केली. दोन्ही मुलींवर वारंवार अत्याचार केला. त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुली सुद्धा काही बोलत नव्हत्या.

nagpur, court
Udayanraje Song Viral : 'तेरे बिना जिया जाये ना' वाढदिनी काेणासाठी म्हटलं उदयनराजेंनी गाणं (व्हिडिओ पाहा)

मात्र त्या काही दिवस त्या मामाकडे राहायला गेल्या. त्यावेळी दाेघींची परत वडिलांकडे जाण्याची तयारी नव्हती. तेव्हा मामाने कारण विचारल्या नंतर मुलींनी सगळा प्रकार मामाला सांगितलं. त्यावरून मामाने त्यांना सोबत घेत तहसील पोलीस स्टेशनला तक्रार दिली. (Breaking Marathi News)

यानंतर पाेलिसांनी आराेपीला अटक केली. हे प्रकरण नागपूर विशेष सत्र न्यायालयात चालले. आरोपीला लैंगिक अपराधांपासून बालसंरक्षण अधिनियमातील कलम ४ (२) व कलम ६ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय, त्याला अन्य काही कलमांतर्गत वेगवेगळ्या कालावधीच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सर्व शिक्षा त्याला एकत्र भोगायच्या आहेत असा आदेश न्यायालयाने दिल्याचे सरकारी वकील रश्मी खापर्डे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com