
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा (Corona) आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात नव्याने कोरोनाचे संकट येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे. रविवारी राज्यात कोरोनाचे २९४६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
राज्यात एकूण कोरोनाच्या सक्रिय (Corona Positive) रुग्णांची संख्या १६३७० झाली आहे. तर राज्यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या १, ४७, ८७० झाली आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात एकूण २९४६ नवीन रुग्ण आढळून आले आहे. तर दिवसभरात १४३२ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यात आता पर्यंत एकूण ७७,४६, ३३७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ९७.९२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव
भंडारा (Bhandara) जिल्ह्यात कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. आज जिल्ह्यात तब्बल ७ नव्या कोरोना रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे जिल्हाची कोरोना (Corona) सक्रिय रुग्ण संख्या ९ झाली आहे. विशेष म्हणजे ४५८ लोकांची चाचणी केल्यावर ७ नवे रुग्ण आढळले आहे. भंडाऱ्यात आतापर्यंत ६७ हजार ९२५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ६६ हजार ७७४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत १ हजार १४२ रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात सक्रीय रूग्ण वाढत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्यात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता कोरोना नियम पाळण्याची गरज निर्माण झाली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.