लसीकरणाअभावी तिसरी लाट रोखणार कशी? : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

लसीकरणाअभावी तिसरी लाट रोखणार कशी? : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
Dr. Shrikant Shinde

डोंबिवली : गेल्या काही दिवसांपासून काेराेना प्रतिबधंकची पुरेशी लस corona vaccine उपलब्ध होत नसल्याने कल्याण डोंबिवली kalyan dombivli महापालिकेकडून लसीकरण वारंवार बंद ठेवले जाते. लसीकरण संदर्भात कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे shrikant shinde म्हणाले केंद्राने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. आपण काेराेनाच्या तिस-या लाटेबाबत coronavirus third wave बोलत असताे आणि लसीकरणच झाले नाही तर तिसरी लाटे रोखणार कसे? प्रत्येक महापालिकेला आणि राज्याला मुबलक प्रमाणात लस उपलब्ध केली पाहिजे असेही खासदार डाॅ. शिंदे यांनी नमूद केले. (covid19-vaccination-drive-coronavirus-third-wave-shrikant-shinde-dombivli-marathi-news)

डोंबिवली येथील महावीर नगर सोसायटीने ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प तयार केला आहे. त्याचे उद्घाटन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकारांनी खासदार डाॅ. शिंदे यांना विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी उत्तर दिले.

डोंबिवली महावीर नगर सोसायटीने ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प तयार केला त्याचे काैतुक खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केले. ते म्हणाले ओला सुका कचरा वर्गीकरण करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक सोसायटीने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन खत निर्मिती केल्यास कचऱ्याचा भार कमी होईल. महावीर सोसायटी प्रमाणे अन्य सोसायटय़ांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा.

Dr. Shrikant Shinde
नाद खूळा; प्रद्युम्नची स्कॉटिश घाेडेसवारी अजिंक्यपदसाठी निवड

यावेळी केडीएमसी अधिकारी कोकरे, शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेविका सुनिता पाटील, सामाजिक कार्यकर्ते संजय चौधरी उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com