एकही रुग्णाची झाली नाही नाेंद; काळजी घ्या, सुरक्षित रहा!
corona update

एकही रुग्णाची झाली नाही नाेंद; काळजी घ्या, सुरक्षित रहा!

corona update अकोला : अकाेलाे जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पहिल्यांदाच शून्य रुग्ण असल्याचा दिवस अकोलेकरांसाठी दिलासादायक ठरला आहे. परंतु तिसऱ्या लाटेचा धोका कायम असून अकोलेकरांनी अजूनही कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. (covid19-zero-patients-found-akola-marathi-news)

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव सात एप्रिल 2020 या कालावधीत झाला. त्यानंतर आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्णसंख्या पाहायला मिळाली. अनेकांचा मृत्यू झाला. दरम्यान आता पुन्हा संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोकाही वर्तविला जात आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊन झालेल्या कालावधीत आतापर्यंत जिल्ह्यातील 57 हजार 717 जणांना कोरोनाने संक्रमित केले आहे. आजपर्यंत एक हजार 133 जणांचा बळी गेला. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत कोविडच्या गंभीर रुग्णांची संख्या लक्षणीय होती. ऑक्सिजनसोबतच व्हेंटिलेटरच्या खाटाही रुग्णांना मिळत नसल्याने व्हेंटिलेटरअभावी अनेकांचा मृत्यू झाला.

अखेर जिल्ह्यात जून महिन्याच्या शेवटी रुग्णसंख्या ओसरायला सुरुवात झाली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात रुग्णसंख्येत कमालीची घट झाली. जुलैचा पंधरवडा अकोलेकरांसाठी दिलासादायक ठरला आहे. अकोल्यात आता केवळ 45 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शनिवारी (ता.17) प्राप्त झालेल्या अहवालानुसार अकोल्यात 438 जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. याबराेबरच रॅपिड तपासणी चाचण्या करण्यात आल्या. यामध्येही सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. याबराेबरच शनिवारी (ता.17) एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. त्यामुळे अकोलेकरांसाठी ही दिलासदायकच बातमी म्हणावी लागेल. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनसह अकोलेकरांनी सज्ज होणे गरजेचे आहे.

corona update
मूलगी झाली हाे! ऑईल टाकुन आईला दिलं पेटवून; नातेवाईकावर आराेप

शनिवार (ता.17) रात्री अखेरची संख्या

एकूण पॉझिटीव्ह अहवाल : 57717

मयत : 1133

डिस्चार्ज : 56539

दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह) :45

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com