साताऱ्यातील बाजारपेठेत काेविड १९ RT-PCR तपासणी मोहीम सुरु

साताऱ्यातील बाजारपेठेत काेविड १९ RT-PCR तपासणी मोहीम सुरु
rtpcr test

सातारा : सातारा जिल्ह्यात काेविड १९ ची रुग्ण संख्या थाेड्या फार प्रमाणात कमी झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून दरराेज ५०० पेक्षा कमी रुग्ण संख्या नाेंदवली जात आहे. सणासुदीचा काळ नजीक आल्याने नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. नागरिकांनी मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर पाळणे या गाेष्टींबराेबरच काेवडि १९ च्या तपासणी करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. दरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सातारा पाेलिस दलाने शहरातील मुख्य बाजारपेठेत आरटी पीसीआर RT- PCR Test तपासणी माेहिम राबविण्यास आजपासून (मंगळवार) प्रारंभ केला आहे. covid9-rtpcr-test-satara-ganesh-festival-2021-sml80

ही माेहिम शहरातील मोती चौक ते जुना मोटर स्टॅण्ड आणि खण आळी या प्रमुख बाजारपेठांमध्ये राबविण्यात येत आहे. ऑन द स्पॉट आरटीपीसीआर rtpcr test तपासणीच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबाेधन देखील करण्यात येत आहे.

rtpcr test
काळजी घ्या! बाप्पाच्या उत्सवानंतर ७ जिल्ह्यात काेविडचे विघ्न

सध्या सणांची लगबग असल्यामुळे बाजारपेठ गर्दीने फुलल्या आहेत. त्यामुळे कोणतीही जोखीम आपल्याला घ्यावयाची नाही. वाहतूक शाखेने आज सकाळपासून ही तपासणी मोहीम सुरू केली आहे. ज्या नागरिकांची तपासणी केली जात आहे त्यांचा संपर्क क्रमांक नाेंदविला जात आहे. त्यानंतर त्यांच्या क्रमांकावर तपासणी अहवाल पाठविला जाणार आहे अशी माहिती सातारा शहर वाहतूक शाखेचे प्रमुख विठ्ठल शेलार यांनी दिली.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com