गोठ्याला अचानक लागलेल्या आगीमध्ये होरपळून गाईचा जागीच मृत्यू
गोठ्याला अचानक लागलेल्या आगीमध्ये होरपळून गाईचा जागीच मृत्यूभूषण अहिरे

गोठ्याला अचानक लागलेल्या आगीमध्ये होरपळून गाईचा जागीच मृत्यू

तालुक्यामधील आर्णी या गावात गोठयाला अचानक आग लागल्यामुळे, गाभण असलेली गाय व आणखी एक वासरू या दुर्घटनेमध्ये भाजले गेले आहेत.

धुळे : तालुक्यामधील आर्णी Arni या गावात गोठयाला अचानक आग Fire लागल्यामुळे, गाभण असलेली गाय Cow व आणखी एक वासरू या दुर्घटनेमध्ये भाजले गेले आहेत. या अपघातात गाभण गाईचा आगीमध्ये भाजल्याने, जागीच मृत्यू dies झाला आहे. तर वासरू देखील मोठ्या प्रमाणात भाजल्याने त्यास पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये hospital उपचारासाठी नेण्यात आले आहे. Cow dies in fire

सकाळी नऊ ते साडे नऊवाजेच्या दरम्यान बाबूलाल रतन माळी या गरीब शेतकऱ्याच्या गोठ्याला अचानक आग लागल्याने, परिसरामधील नागरिकांच्या निदर्शनास आले होते. बाबूलाल माळी हे शेतकरी सकाळी शेतीची agriculture कामे पूर्ण करण्यासाठी, शेतात गेले असताना आर्णी गावात असलेल्या त्यांच्या गोठ्याला अचानक आग लागली आहे.

हे देखील पहा-

परिसरामधील नागरिकांना गोठ्याला आग लागल्याचे निदर्शनास आल्यावर नागरिकांनी लगेच आग विझविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, तोपर्यंत संपूर्ण गोठा जळून खाक झाला आणि त्यातमध्ये बांधलेली गाभन असलेली गाय व वासरू मोठ्या प्रमाणात भाजले गेले आहे. या घटनेची माहिती मिळताच बाबूलाल माळी यांनी गोठ्याच्या दिशेने धाव घेतली आहे. Cow dies in fire

गोठ्याला अचानक लागलेल्या आगीमध्ये होरपळून गाईचा जागीच मृत्यू
दिल्लीतील CBI मुख्यालयाला भीषण आग

गोठ्यात भाजून मृत्युमुखी पडलेली गाभण गाय आणि भाजलेल्या अवस्थेमध्ये पडलेले वासरू बघून बाबूलाल माळी यांना अश्रू अनावर झाले नाहीत. या गरीब शेतकऱ्याचे या आगीच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, असून प्रशासनाने याबाबत दखल घेत या गरीब शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्याच्या वतीने गावातील सरपंच प्रकाश कोळी यांनी यावेळी केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com