सांगलीमध्ये साकारला शिवकालीन बारा बलुतेदारांचा देखावा!

सुदन जाधव या मेकॅनिकल इंजिनिअरने आपल्या घरगुती गणेशमुर्ती जवळ हा देखावा तयार केला आहे.
सांगलीमध्ये साकारला शिवकालीन बारा बलुतेदारांचा देखावा!
सांगलीमध्ये साकारला शिवकालीन बारा बलुतेदारांचा देखावा!विजय पाटील

सांगली : मिरजेत घरगुती गणेश मूर्ती जवळ एका तरुणाने बारा बलुतेदारांचा देखावा साकारला आहे. या आधुनिक काळात ऑनलाईन खरेदी आणि आधुनिक साधनांमुळे बारा बलुतेदार अडचणीत आला आहे तसेच या देखाव्याच्या माध्यमातून शिवकालीन बारा बलुतेदारांकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी हा देखावा साकारल आहे. (Created a Shiva-era scene in Sangli)

हे देखील पहा-

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत गुण्या-गोविंदाने एकत्र नांदणारे बारा बलुतेदारांचे लोकजीवन आजच्या आधुनिक युगात नामशेष होत चालले आहे. याला जबाबदार शासन आणि जनता दोघे ही आहेत. या अडचणीत आलेल्या बारा बलुतेदारांकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी सुदन जाधव या मेकॅनिकल इंजिनिअरने आपल्या घरगुती गणेशमुर्ती जवळ बारा बलुतेदार हा देखावा तयार केला आहे.

नोकरी सांभाळतच त्याने देखावा तयार करण्याचे काम सुरू केले गेल्या दोन ते अडीच महिन्यांच्या परिश्रमानंतर सदरचा देखावा पूर्णत्वास आला आहे. विशेष म्हणजे सदरचा देखावा हा पूर्णत: इकोफेंडली आहे. शाडू मातीच्या माध्यमातून शेतकरी, सोनार, लोहार, चांभार, कुंभार, सुतार, न्हावी, शिंपी, परिट, गुरव, मातंग अशा बारा बलुतेदारांच्या आकर्षक, सुबक आणि रेखीव मूर्त्या, त्यांची घरे, गुरे आणि अवजारेही साकारण्यात आली आहेत. याशिवाय घरे, घरांसमोरील झाडे, अंगण, पारावरचा कट्टा, दळण-वळणाची साधने यांचाही समावेश करण्यात आला आहे. या देखाव्यात शेतकऱ्याला प्रथम प्राधान्य देण्यात आले असून, शिवकालीन राजवटीत शेतकरी हाच बारा बलुतेदारांचा पोशिंदा असल्याचे दाखविण्यात आले आहे.

सांगलीमध्ये साकारला शिवकालीन बारा बलुतेदारांचा देखावा!
मैत्रिणीच्या सांगण्यावरून मित्रांनी घातला दरोडा; महिला डॉक्टरला लुटणाऱ्या ५ जणांना अटक

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत बारा बलुतेरांना जबर फटका बसला त्यांचे अनेक पारंपारीक उद्योग-धंदे बंद पडले. वर्षानुवर्षे गुण्या-गोविंदाने नांदणारी बारा-बलुतेदारांची सांस्कृती लुप्त होत चालली आहे त्यामुळे शिवकालीन बारा बलुतेदारांकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी हा देखावा साकारल्याचे सुदन जाधव याने सांगितले.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com