Umesh Yadav News : धक्कादायक! क्रिकेटपटू उमेश यादवची फसवणूक, मॅनेजरनेच लावला ४४ लाखांचा चुना

नागपुरातील कोराडी पोलीस स्थानकात आरोपी मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल
Umesh Yadav News
Umesh Yadav NewsSaam Tv

Nagpur Umesh Yadav News : भारतीय संघाचा फास्ट बॉलर उमेश यादव याची 44 लाख रुपयांनी आर्थिक फसवणूक झाली आहे. आर्थिक फसवणूक झाल्या प्रकरणी उमेश यादव याने नागपुरातील कोराडी पोलीस स्थानकामध्ये त्याचा एकेकाळी मॅनेजर असलेल्या शैलेश ठाकरे याच्या विरोधात आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

Umesh Yadav News
Aurangabad News : औरंगाबाद बनलंय दुचाकी चोरीचे हॉटस्पॉट; गेल्या वर्षी 'इतक्या' वाहनांची चोरी

नेमक प्रकरण काय ?

उमेश यादव याला भारतीय क्रिकेट (Cricket) संघात निवड झाल्याने त्याला देशात आणि देशाबाहेर खेळण्यासाठी जावे लागत असल्याने त्याने त्याचा मित्र असलेला आरोपी शैलेश ठाकरे याला पत्रव्यवहार, इन्कम टॅक्स, बँकेचे (Bank) व इतर व्यवहाराकरिता पगारी मॅनेजर म्हणून ठेवले होते. आरोपीने उमेश यादव (Umesh Yadav) याची कोणतीही कामे केली नाही.

Umesh Yadav News
Teacher Beaten Student : भयंकर! विद्यार्थ्याचे केस खेचले, लाथाबुक्क्यांनी मारले; शिक्षकांच्या क्रूर शिक्षेचा Video Viral

तसेच उमेश यादव याने प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी कोराडी हद्दीतील एमएसईबी कॉलनी येथील स्टेट बँक शाखेतील खात्यात एकूण 44 लाख रुपये ठेवले होते. ते 44 लाख रुपये शैलेश ठाकरे याने परस्पर काढून स्वतःच्या नावे प्रॉपर्टी खरेदी केली व उमेश यादव याला पैसे परत दिले नाही आणि फसवणूक केली. कोराडी पोलिसांनी याप्रकरणी कलम 406, 420 भादवी अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस (Police) आरोपी शैलेश ठाकरेचा शोध घेत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com