अवघ्या दोन लाखांसाठी सावकाराने २५ लाखांची जमीन लुबाडली

अवघ्या दोन लाखांसाठी सावकाराने २५ लाखांची जमीन लुबाडली
crime news

अहमदनगर : कर्जत पोलिसांनी बेकायदा सावकारकी करणाऱ्यांविरूद्ध मोहीम उघडली आहे. अव्वाच्या सव्वा व्याज उकळणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. पोलिसांकडून कारवाई होत असल्याने सावकाराच्या दडपणाखाली असलेले लोकही समोर येऊन तक्रार देऊ लागले आहेत. दोन लाख रूपयांसाठी तब्बल २५ लाख रूपयांची जमीन लिहून घेणाऱ्या सावकाराला कर्जत पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे.

पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी संबंधित सावकाराविरूद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली. या बाबत कुंडलिक छगन सुपेकर (रा.मिरजगाव ता. कर्जत) यांच्या फिर्यादीवरून सुखदेव दिनकर केदारी (रा.मिरजगाव ता.कर्जत) याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.Crime against illegal lenders at Karjat

crime news
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार?

व्यवसायासाठी पैशाची गरज असल्याने मिरजगाव येथील कुंडलिक सुपेकर यांनी सन २०१५ मध्ये संदीप यांच्याकडे पैसे मागितले. संदीप यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी एका सावकाराची ओळख करून दिली. 'माझ्या परिचयाचा खाजगी सावकार असून त्यांच्याकडून पैसे घेऊ शकतो असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी व फिर्यादीचे परिचयाचे संदीप यांनी खाजगी सावकार सुखदेव केदारी यांच्याकडून २ लाख रुपये घेऊन दिले. त्यासाठी दरमहा ४ रुपये टक्के व्याजदर त्याने लावला. त्याबदल्यात फिर्यादीच्या मालकीची मधुकमल मंगल कार्यालयाच्या समोरील २० गुंठे जमीन मध्यस्ती संदीपच्या नावे करण्याचे ठरले. ७ डिसेंबर २०१५ रोजी जमिनीचे खरेदी खत संदीपच्या नावे करून दिले.

दुसऱ्या दिवशी केदारी यांनी फिर्यादीला २ लाख रुपये ४ टक्के व्याजदराने आणून दिले. त्या पैशांचे ४ महिन्यांचे पैसे दिले. मात्र, त्यानंतर फिर्यादीला वेळेवर व्याज देणे जमले नाही. त्यामुळे सावकाराने संदीप याच्या नावे असलेले क्षेत्र पत्नी छाया केदारी हिच्या नावावर करून देण्याचे सांगितले. त्या नुसार ता २३ जानेवारी२०१७ रोजी सदर क्षेत्र हे सावकाराच्या पत्नीच्या नावे करून दिले. खरेदी झाल्यावर फिर्यादीला ही बाब समजली. व्याज व मुद्दल दिल्यानंतर सदरील जमीन ही पुन्हा आपल्या नावे पलटून देण्याचे ठरले होते.

फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांनी सावकाराकडे जाऊन सर्व रक्कम परत देऊन जमीन पलटून देण्याची विनंती केली.मात्र सावकार व त्याची पत्नी व इतर यांनी 'जमीन पुन्हा मला मागायची नाही ही जमीन आम्ही दत्तात्रय कोरडे याच्याकडून घेतली आहे. त्यात तुमचा काहीही संबंध नाही. जर जमीन हवी असेल तर मला २५ लाख द्यायचे. २० गुंठ्यातील २ गुंठे क्षेत्र माझ्या नावे करून द्यावे लागेल, अशी अट घातली.

फिर्यादीने प्रतिष्ठित मंडळी, राजकीय मंडळी अनेकांना मध्यस्ती करायला लावले. मात्र, सावकार आपल्या अटीवर ठाम होता. फिर्यादीची हालचाल पाहून सावकाराने (ता ७ जून २०२१ रोजी) कर्जतच्या बँकेकडून ९ लाखांचा बोजा चढवला.

याबाबत विचारपूस केली असता 'मी आता चालू बाजारभावाने हे क्षेत्र विकणार आहे. तुला काय करायचे ते कर'असे सुनावले. त्यानंतर सावकार हा कोकणगाव येथील एका इसमाला सदरील क्षेत्र 28 लाख रुपयांनाला विकत असल्याचे समजले. फिर्यादीने सावकार सुखदेव केदारी, छायाबाई केदारी व इतर यांच्याविरोधात फिर्याद दिली.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजगाव पोलीसक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, पोलीस नाईक बबन दहिफळे, प्रबोध हांचे, जितेंद्र सरोदे हे पुढील तपास करीत आहेत.Crime against illegal lenders at Karjat

तक्रार देण्यास पुढे या..

अवैध सावकारकीत सावकारांकडून गोरगरीबांच्या, शेतकऱ्यांच्या जमिनीही आपल्या नावावर करून घेण्यात आल्या आहेत. मात्र, अशा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कर्जत पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. सावकारांकडून कोणास त्रास असल्यास पोलिसांशी संपर्क करावा. सावकारांना घाबरण्याची गरज नाही. तक्रारदाराला मदत केली जाईल.

- चंद्रशेखर यादव,पोलीस निरीक्षक, कर्जत.

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com