Nanded Robbery : हदगाव दरोडा प्रकरणात १० दिवसांतच तीन आरोपींना अटक, दोन चोरटे अद्यापही फरार

नांदेड जिल्ह्यातील दरोड्याच्या घटनेचा दहा दिवंसातच पोलिसांना छडा लावला आहे.
Robbery in Nanded
Robbery in NandedSaam TV

नांदेड : जिल्ह्यातील हदगावमध्ये (Nanded Robbery News) व्यापारी यादव अप्पा गंधेवार शेट्टी यांच्या घरी पाच दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. चोरट्यांनी ७१ तोळे सोन्याचे दागिने (Gold Robbery) पाच लाख रुपये रोख रक्कम लंपास केली होती. चोरट्यांनी शेट्टी यांच्या कुटुंबीयांना मारहाणही केली होती. घरात असलेल्या सहा महिन्याच्या बालकाला पळवून नेण्याची धमकी देत चोरट्यांनी शेट्टी यांच्या घरात दरोडा टाकला होता. परंतु, पोलिसांनी या गंभीर प्रकरणाचा छडा लावून (Three Thieves Arrested) तीन दरोडेखोरांना अटक केली आहे. दशरथ गंगाराम देवकर, राजू लचिराम देवकर आणि लक्ष्मण पिराजी मेटकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

Robbery in Nanded
सोनिया गांधी-स्मृती इराणी यांच्यात शाब्दिक चकमक, सुप्रिया सुळेंनी सांगितले त्यावेळी काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, शेट्टी यांच्या घरात टाकलेल्या दरोड्याचा दहा दिवसांतच पोलिसांनी तपास लावला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातून तीन आरोपींना अटक केली आहे. उर्वरीत दोन आरोपी अद्यापही फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी दरोडेखोरांकडून काही मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक केलेल्या तीन आरोपींना हदगावच्या न्यायालयात हजर केले असता, आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कामगिरीचं जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी कौतुक केलं आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com