Breaking: वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापुरात गुन्हा दाखल

कोल्हापूर, पुण्यानंतर आता सोलापुरात गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Gunaratna Sadavarte
Gunaratna SadavarteSaam TV

सोलापूर: एसटी (ST) कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी केलेल्या हल्ल्या प्रकरणी अटकेत असलेल्या वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सातारा, कोल्हापूर, पुण्यानंतर आता सोलापुरात गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पाहा

मराठा आरक्षणाच्या निकाला संदर्भात न्यायालयाच्या निकालाचा अवमान केल्याबद्दल आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १५३अ ब, ५००, ५०६,५०६, ५०७ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर पोलिसात (Police) छावा संघटनेचे शहराध्यक्ष योगेश पवार यांनी फिर्याद दिली आहे.

बीडमध्येही गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या निवास्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्याचे कटकारस्थान रचल्याप्रकरणी सदावर्ते सध्या अटकेत आहेत. तसेच सदावर्ते यांच्यावर विविध प्रकरणात विविध गुन्हेही राज्यभरातून दाखल होत आहेत.

भाजपचे तालुका अध्यक्ष स्वप्निल गलधर यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधामध्ये बीडच्या (Beed) शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. यामध्ये सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणे, मराठा (Maratha) समाजाला अत्याचारी समाज असे संबोधित करणे, आरक्षणासंदर्भात वेळोवेळी मराठा समाजाचा अपमान करणे, त्याचबरोबर चर्चेत राहण्यासाठी माध्यमांसमोर जाऊन मराठा समाजाच्या भावना वारंवार दुखावणे आदी बाबींची तक्रार स्वप्निल गलधर यांनी बीड पोलिसात दिली होती.

याच तक्रारीवरून शिवाजीनगर (Shivajinagar) पोलिस ठाण्यामध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सदावर्ते यांना तात्काळ अटक न झाल्यास मराठा समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा स्वप्निल गलधर यांनी दिला आहे. डंके की चोट पर आम्ही सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे असे देखील यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com