Crime News: महिला दिनी नागपूर हादरले! पतीने केली पत्नीची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

Nagpur Crime News: महिला दिनाचा उत्साह सुरू असतानाच भीषण हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे.
Nagpur Crime News
Nagpur Crime NewsSaam tv

Nagpur: आज ८ मार्च. जागतिक महिला दिन. जगभरात महिला दिन उत्साहात साजरा केला जात असतानाच नागपुरात मात्र भीषण हत्येची घटना उघडकीस आली आहे. चारित्र्यावर संशय घेत पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे, ज्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. (Latest Marathi News Update)

Nagpur Crime News
Nagar : नगर जिल्हा बॅंक अध्यक्षपद निवडणूक; अखेरच्या क्षणी भाजपने 'मविआ'चे मनसुबे उधळून लावले, एक मताने बाजी

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, नागपुरच्या (Nagpur) कलमना पोलिस स्टेशन हद्दीतील मिनिमाता नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी अमर भारद्वाज याने स्वतः पत्नीच्या डोक्यावर हातोड्याने वार करत हत्या केली आहे. ललिता भारद्वाज असे 40 वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या हत्येचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

Nagpur Crime News
Nashik Accident : कुटुंबावर काळाचा घाला; नाशिकमध्ये भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

दरम्यान, महिला दिना दिवशीच ही भीषण हत्येची बातमी समोर आल्याने नागपूर शहरात खळबळ माजली आहे. तसेच नागपुरमधील वाढती गुन्हेगारी पुन्हा चिंतेचा विषय ठरत असल्याचे दिसत आहे. तत्पुर्वी पुण्यातही महिला दिना दिवशीच सासूने सुनेची हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यामुळे एकीकडे महिला दिन साजरा होत असतानाच दुसरीकडे अशा हत्येच्या घटना समोर आल्याे महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Crime News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com