औरंगाबाद हादरलं! 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार

औरंगाबादेतील धक्कादायक घटना; छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Aurangabad Police Station
Aurangabad Police Station Saam Tv

नवनीत तापडिया

औरंगाबाद - एकतर्फी प्रेमातून भरदिवसा 19 वर्षीय तरुणीचा खून केल्याची घटना ताजी असतानाच औरंगाबादमध्ये आणखी एक धक्कदायक घटना घडली आहे. घरातून पाणीपुरी खाण्यासाठी बाहेर गेलेल्या 16 वर्षीय मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना औरंगाबादच्या (Aurangabad) छावणी पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आकाश कांबळे असे या नराधमाचे नाव आहे. (Aurangabad Crime News)

Aurangabad Police Station
Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १८ तासांपासून ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा

अल्पवयीन मुलीच्या आईने या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात 21 सप्टेंबर रोजी 16 वर्षीय मुलगी पाणीपुरी खाण्यासाठी बाहेर गेली ती परत आली नसल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सीसीटीव्हीची तपासणी केल्यानंतर मुलगी आकाश कांबळे या तरुणासोबत जाताना आढळली.

त्या तरुणाची ओळख पटवून तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीसह मुलीला शोधून काढले. आरोपीची चौकशी केल्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले यानुसार छावणी पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून औरंगाबाद शहर व परिसरात अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी एकतर्फी प्रेमातून भरदिवसा 19 वर्षीय तरुणीचा खून केल्याची घटना ताजी असतानाच औरंगाबादमध्ये 16 वर्षीय मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com