Crime News : धक्कादायक! कारागृहात कैद्याला बेदम मारहाण; ६ जणांवर गुन्हा दाखल

कारागृहातल्या बॅरक क्रमांक तीन जवळ हा प्रकार घडला आहे.
Maharashtra jail News
Maharashtra jail Newssaam news

Sangali News : सांगली जिल्हा कारागृहामध्ये एका कैद्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. कारागृहामधल्या सहा कैद्यांकडून ही मारहाण करण्यात आली आहे. सागर उर्फ कृष्णा नरोटे या कैद्याला मारहाण झाली आहे. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत मारहाण करणाऱ्या सहा जणांवर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली शहरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये एका कैद्याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. कारागृहातल्या बॅरक क्रमांक तीन जवळ हा प्रकार घडला आहे. वैयक्तिक कारणातून सहा कैद्यांना मिळून सागर नरोटे या कैद्याला ही मारहाण करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी रोहित उर्फ बाला गाडे, योगेश शिंदे, करण पाटील, धनराज राऊत, विजय उर्फ यशवंत सोनावले आणि दत्तात्रय खांडेकर या सहा कैद्यांविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra jail News
Crime News: थरारक! आधी महिलेची हत्या केली मग काळीज शिजवून खाल्लं

सांगली शहरातील कारागृहात झालेल्या या घटनेमुळे तेथे भीतीचे वातावरण पसरले आहे. हणामारीत जखमी कैद्यावर उपचार सुरू आहेत.

Maharashtra jail News
Pune Crime News : बायको आणि मुलाची हत्या करत अभियंत्याने स्वत:लाही संपवलं; पोलिस तपासात धक्कादायक कारण समोर

खुनाच्‍या गुन्‍ह्यातील कैदीने फोडले सहकैद्याचे डोके; भंडारा कारागृहातील प्रकार

भंडारा येथे देखील गेल्या वर्षी अशीच एक घटना घडली होती. यावेळी खून आणि अपहरणाच्या गुन्ह्यात न्यायालयीन बंदी असलेल्या कैदीने क्षुल्लक कारणावरून आपल्या बॅरेकमधील सहकैद्याचं डोकं फोडलं होतं. जेवण वाढताना त्याला डावलल्याने कैद्याला राग आला आणि रागाच्या भरात त्याने सहकैद्याच्या डोक्यावर हल्ला केला होता. मारहाण करणारा कैदी हा मानसिक रोगी असल्‍याचे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com