Crime News: जेलमध्ये झाली तिघांची मैत्री, सुटल्यानंतर आखला मोठा प्लॅन; 'थ्री इडियट्स'चा अजब कारनामा

Kalyan Theft News: तिन्ही चोरट्यांची मैत्री जेलमध्ये झाली होती. जेलमधून सुटल्यानंतर तिघे पुन्हा भेटले आणि त्यांनी चोरीचा प्लॅन आखला.
Kalyan Theft News
Kalyan Theft Newssaam tv

>>अभिजित देशमुख, कल्याण

Kalyan News : जेलमधून सुटल्यानंतर चोरीचा प्लॅन आखलेल्या दोन सराईत चोरट्यांना कल्याण कोलशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राहुल पंडित आणि सागर शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांचा म्होरक्या अमन खान हा पसार झाला आहे.

विशेष म्हणजे या तिन्ही चोरट्यांची मैत्री जेलमध्ये झाली होती. जेलमधून सुटल्यानंतर तिघे पुन्हा भेटले आणि त्यांनी चोरीचा प्लॅन आखला. यानंतर त्यांनी कल्याण पूर्वेतील फ्लिपकार्टच्या गोदामातून मोबाईलसह इतर महागडे साहित्य चोरी केले आणि तिघे वेगवेगळ्या दिशेने पसार झाले.

Kalyan Theft News
Sambhajinagar News: गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकरी दाम्पत्याने संपवलं जीवन, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतत पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे चोरटे चोरी करताने आढळले. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असताना यातील एक आरोपी राहुल पंडितने चोरी केलेला मोबाईल सुरू केला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. यातील दोघांना पोलिसांनी अटक केलीये, तर फरार असलेला अमन खान याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, कल्याण पूर्वेत सूचक नाका परिसरातील एका फ्लिपकार्टच्या गोदामात रात्रीच्या सुमारास चोरी झाली होती. चोरट्यांनी गोडाऊनच्या मागील बाजूस असलेले ग्रिल तोडून गोडाऊनमध्ये डिलिव्हरीसाठी ठेवलेले सव्वा पाच लाखांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Latest Marthi News)

राहुल पंडित, सागर शिंदे व अमन खान या तिघांची मैत्री जेलमध्ये झाली होती. जेलमधून सुटल्यानंतर हे तिघे पुन्हा एकत्र भेटले आणि चोरी करण्याचा प्लॅन आखला. ही चोरी करण्यासाठी राहुल पंडित याने नेरूळ येथून एक रिक्षा देखील चोरी केली. याच रिक्षात सागर पंडित आणि अमन खान बसून गोडाऊनजवळ गेले. हे तिन्ही चोरटे चोरीच्या घटनेच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले.

Kalyan Theft News
Ind vs Aus: शेन वाॅर्नच्या 'बाॅल ऑफ द सेंच्यूरी'ला टक्कर देणारा कुलदीपचा 'ड्रीम बाॅल' पाहीलात का? - VIDEO

कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे आणि पगारे यांच्या पथकाने या आरोपींचा शोध सुरू केला. चोरी केल्यानंतर तिन्ही चोरटे वेगवेगळ्या शहरात पसार झाले होते. पोलिसांचा सीसीटीव्ही फुटेच्या आधारे तपास सुरू असताना गोडाऊनमधून चोरी गेलेल्या मोबाईलमधून एक मोबाईल सुरू झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. (Crime News)

पोलिसांनी या मोबाईलचा माग काढला असता हा मोबाईल जालन्यामध्ये असल्याचा निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ जालना गाठून तेथून राहुल पंडित या चोरट्याला बेड्या ठोकल्या. राहुलने चौकशी दरम्यान सागर शिंदे आणि अमन खान या त्याच्या दोन साथीदारांची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ सागर शिंदे याला उल्हासनगर येथून अटक केली. यादरम्यान अमर खान मात्र पसार होण्यात यशस्वी झाला. दरम्यान हे तिघे सराईत गुन्हेगार असून या तिघांविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com