वसमतला अनैतिक संबंधातून खून; पती- पत्नी अटकेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कारखाना रोडवर जवळील वसाहतींमध्ये राहणाऱ्या एका महिलेने किशन रमेश चन्ने रा. गणेशपेठ वसमत याला घरी बोलावले
वसमतला अनैतिक संबंधातून खून; पती- पत्नी अटकेत
वसमतमध्ये क्राईम न्यूज, खुनाची घटना

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : वसमत येथे अनैतिक संबंधातून एकाचा चाकुने भोसकुन खून केल्याची घटना कारखाना रोडवर रविवारी ( ता. ११ ) सकाळी नऊच्या सुमारास घडली. याबाबत शहर पोलिसांनी आरोपी असलेल्या पती- पत्नीला शहर पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयसमोर सोमवारी (ता. १२) हजर करणार असल्याचे तपासीक अंमलदार तथा फौजदार बाळासाहेब खार्डे यांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कारखाना रोडवर जवळील वसाहतींमध्ये राहणाऱ्या एका महिलेने किशन रमेश चन्ने रा. गणेशपेठ वसमत याला घरी बोलावले. यावेळी त्या महिलेसोबत किशन चन्ने हा दिसला असता दरम्यान तीचा पती बाबुराव गायकवाड अचानक घरी आला. यावेळी दोघांना एकत्र पाहिल्याने भांबावलेल्या महिलेने किशन चन्ने हा माझ्यासोबत बळजबरी करीत असल्याचे सांगितले.

हेही वाचा -

यावेळी पत्नीच्या सांगण्यावरुन बाबुराव गायकवाड यांनी घरातील चाकू घेऊन किशन चन्ने यांच्यावर वार केले. यामध्ये किशन गंभिर जखमी होऊन ठार झाला. दुर्गा किशन चन्ने यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पती- पत्नीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पती पत्नी अटक केले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी यतिष देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब खार्डे करत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com