Amravati News: अमरावतीत पुन्हा २ देशी कट्टे आणि ८ जिवंत काडतुस जप्त

२ देशी कट्टे आणि ८ जिवंत काढतूस जप्त करण्यात आली आहे.
Crime News, Lonavala
Crime News, LonavalaSaamTv

अमर घटारे

Amravati News: अमरावतीत दिवसागणिक देशिकट्टे आढळतं आहेत. २ दिवसाआधी स्थानिक गुन्हे शाखेकडून २ देशी कट्टे आणि ४ जिवंत काडतुस जप्त करत कारवाई करण्यात आली. आज पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे अमरावतीच्या परतवाडा परिसरात आरोपींचा पाठलाग करून त्यांच्याकडून २ देशी कट्टे आणि ८ जिवंत काढतूस जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Latest Amravati News)

शुक्रवारी स्थानिक गन्हे शाखेने सापळा रचत परतवाडा आठवडी बाजारावर छापा टाकला. यात त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. पोलीस बाजार परिसरात शोध घेत असताना तिथे हे दोन तरुण संशयीत रित्या बसले होते. त्यांची अंगझडती घेतल्यावर पोलिसांना त्यांच्याकडे देशी कट्टा सापडला. दिपक यादव आणि शुभम ठाकुर अशी या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतल्यावर त्यांच्याकडे १ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडे असेल्या शस्त्राचा त्यांच्याकडे कोणताही परवाना त्यांच्याकडे नव्हता. तसेच त्यांच्याकडे जीवंत काडतूस देखील सापडली आहेत. हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून या आधी देखील त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले आहेत.

Crime News, Lonavala
Mohol Police Station : साहेबाला द्यावे लागतात ! लाचखाेर हाेमगार्डने उडवून दिली माेहाळ पाेलिस ठाण्यात खळबळ

पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत शस्त्रसाठा देशी कट्टे आढळतात त्यामुळे नेमकं अमरावतीत चाललंय तरी काय असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला गेला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com