Crime : दहा वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक!

अबु हरेरा कुरदुस खान असे या आरोपीचे नाव आहे. 2010 साली अबुला एका गुन्ह्यात अटक झाली होती. न्यायालयाने त्याला अटी आणि शर्तीवर जामीनवर सोडले होते.
Crime : दहा वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक!
Crime : दहा वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक!विहंग ठाकूर

मुंबई : मागील १० वर्षापासून सतत पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढणाऱ्या सराईत आरोपीला मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विभागाने अटक केली आहे. अबु हरेरा कुरदुस खान असे या आरोपीचे नाव आहे. 2010 साली अबुला एका गुन्ह्यात अटक झाली होती. न्यायालयाने त्याला अटी आणि शर्तीवर जामीनवर सोडले होते.

हे देखील पहा :

मात्र, त्यानंतर अनेक तारखांना अबु हा गैरहजर राहिला होता. म्हणून त्याच्या विरोधात न्यायालयाने अटक वारंट बजावले होते. अबु हा त्याच्या मूळगावी उत्तरप्रदेश मधील प्रथा बाजार सिद्धार्थनगर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस उत्तर प्रदेशला त्याच्या मूळगावी कोडगाव नानकर येथे गेले. मात्र अबुला याची कुण कुण लागल्याने तो फोन बंद करून गावाबाहेर पळून गेला.

Crime : दहा वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक!
अलिबागचा सचिन पाटील जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत करणार भारताचे नेतृत्व

यादरम्यान, गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत अबु सक्रीय होता. दरम्यान, आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी स्थानिक खबऱ्यांची मदत घेतली. यावेळी पोलिस गेले असल्याचे भासवण्यासाठी पोलिस त्याच्या गावापासून 50 किलोमीटर अंतरावर जाऊन थांबले. अबु गावात आल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला बेड्या ठोकत ताब्यात घेतले. आरोपीला ट्रान्जिस्ट रिंमाडवर मुंबईला आणण्यात आले असून न्यायालयाने त्याला 15 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com