Crime Web series Addiction: मोबाइलवर सातत्याने क्राइम वेबसीरीज पाहताय? सावधान! संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

Crime Web series Addiction: नुसतं पाहणं तर सोडाच या क्राइम सीरीज पाहून गुन्हा करण्याचे प्रमाण ५ वर्षांत ३ टक्क्यांनी वाढल्याचं एका रिसर्चमधून समोर आलं आहे.
Crime Web series Addiction
Crime Web series AddictionSaam tv

Crime Serials Addiction: सध्या मोबाइलवर उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या अप्लिकेशनमध्ये क्राईम मालिका पाहण्याकडे कल वाढला असल्याचं दिसून येतं आहे. नुसतं पाहणं तर सोडाच या क्राइम सीरीज पाहून गुन्हा करण्याचे प्रमाण ५ वर्षांत ३ टक्क्यांनी वाढल्याचं एका रिसर्चमधून समोर आलं आहे. (Latest Marathi News)

टीव्हीवरच्या काही क्राइम सीरीज वगळता आणि फिल्म वगळता क्राइम सीरीजचा फारसा बोलबाला नव्हता. पण आता प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड फोन आल्यानंतर वेगवेगळ्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून क्राइम वेबसीरीजने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

त्या क्राइम वेब सीरीज पाहून त्याचा आधार घेत गुन्ह्यांचं प्रमाण वाढल्याचं आता समोर आलं आहे. ३-४ वर्षांपूर्वी क्राइम मालिकांचे एवढे पेव फुटलेले नव्हते. त्या काळात दाखल होणाऱ्या १०० गुन्ह्यांतील एखादा गुन्हेगार मालिका पाहून गुन्हा केल्याची कबुली देत होता. सध्या ते प्रमाण ४ टक्क्यांवर गेल्याची माहिती समोर आली आहे.

Crime Web series Addiction
Eknath Shinde News: नवीन संसदेच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणाऱ्यांवर CM शिंदेंचा हल्लाबोल; म्हणाले...

सध्या शाळेतल्या मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत क्राइम मालिका पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या मालिका मनोरंजनाचा भाग आहेत, परंतु, काही जणांना त्या गुन्हेगारीची वाट दाखवत आहेत. त्याची काही उदाहरणे समोर आली. एकट्या संभाजीनगर शहरात यापूर्वी जेमतेम एक १ गुन्हेगार मालिकांच्या प्रभावाखाली असायचा, गुन्ह्याची कबुलीही द्यायचा. पण आता हीच संख्या ४ टक्के झाली आहे.

संभाजीनगर शहरात क्राइम सीरीज पाहून घडलेले काही गुन्हे चिंतेचा विषय झाला आहे.

- शहरातील सातारा परिसरात एका ४७ वर्षीय बँक व्यवस्थापकाच्या पत्नीने पतीच्या हत्येची दोन लाखांची सुपारी दिली.

- पॉकेटमनी, ओपन कार, तसेच स्पोर्ट्स बाइक वापरण्यासाठी दोन महाविद्यालयीन तरुणांनी एका १० वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केली.

- मागच्या वर्षी अल्पवयीन मुलाकडून पित्याची हत्या केली. वडील सतत अपमान करत असल्याने अल्पवयीन मुलाने मध्यरात्री वडिलांची हत्या केली.

- हनी ट्रॅपमधून ५ लाख उकळले (२०१९) धनाढ्य तरुणाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून एक तरुणी व तिच्या साथीदाराने पाच लाख रुपये उकळले.

Crime Web series Addiction
Pune News: घरात मुलाच्या लग्नाची तयारी; पण नियतीने केला घात... सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा दुर्देवी मृत्यू

क्राइम मालिकांमुळे लहान मुलांपासून मुली-महिला, युवकांच्या मनावर दुष्परिणाम होत असल्याचं दिसून येतंय. आपल्याला होत असलेला त्रास, इच्छा असलेले सध्या करण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी यासाठी क्राइम सीरीजमध्ये पाहिलेल्या काही घटनांचा आधार घेऊन काही जण गुन्ह्याचे प्लॅनिंग करतात.

त्यामुळे चित्रपट, शॉर्ट फिल्म, सिरीयल या समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आणि चांगलं काहीतरी घडवण्यासाठीच साधन आहे. तरी आता ते क्राइम सीरियलच्या माध्यमातून समाज बिघडण्याचं काम होत आहे, हे मात्र नक्की. त्यापासून आपली लहान मुलं आणि आपलं कुटुंब कसं दूर राहील, याचा विचार सगळ्यांनीच केला पाहिजे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com