Crime : बुरखा परिधान करून सोने-चांदी व्यापाऱ्याला लुटणाऱ्या महिलेचा पर्दाफाश!

डोळ्यावर चष्मा, तोंडाला बुरखा, परिधान करून सोने-चांदी व्यापाऱ्याला त्यांच्याच दुकानात लुटणाऱ्या महिलेकडून मोठं घबाड उघडकीस, विदर्भ मराठवाड्यासह राज्यभरातील हातचलाखी करत केलेल्या चोऱ्या उघड.
Crime : बुरखा परिधान करून सोने-चांदी व्यापाऱ्याला लुटणाऱ्या महिलेचा पर्दाफाश!
Crime : बुरखा परिधान करून सोने-चांदी व्यापाऱ्याला लुटणाऱ्या महिलेचा पर्दाफाश!संदिप नागरे

-- संदिप नागरे

हिंगोली : हिंगोलीत सराईत गुन्हेगार असलेल्या बुरखाधारी महिलेला सोन्याचा ऐवज लंपास करताना , सराफा व्यावसायिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना काल सकाळी हिंगोलीत उघडकीस आली होती. एकाच दुकानातून सलग महिन्याभरात दुसऱ्यांदा चोरी करताना ही महिला सराफा व्यावसायिकांनी पोलिसांना पकडून दिली आहे. आता या चोरट्या महिलेने राज्यभर अश्याच प्रकारे चोऱ्या केल्याच्या अनेक घटना पोलीस तपासात पुढे आल्याने हिंगोली पोलिसांचे पथक मागील 72 तासांपासून या सराईत गुन्हेगार महिलेला वेगवेगळ्या जिल्ह्यात सोबत घेऊन गुन्हे उघडकीस आणत आहे.

हे देखील पहा :

धक्कादायक बाब म्हणजे हिंगोलीच्या ज्या सराफा दुकानात महिनाभरापूर्वी या महिलेने 70 हजारांचे सोन्याचे गंठण पळविले होते त्याच दुकानात, दुसऱ्यांदा चोरी करण्यासाठी मुमताज परवीन तोंडाला बुरखा लाऊन आली होती, या वेळेस देखील तीने दीड लाखांचे सोन्याचे गंठण हातचलाखी करत चोरले. मात्र, दुकानातील कामगारांनी तिची चोरी रंगेहाथ पकडत आरडाओरड करत दुकानात कोंडले या नंतर हिंगोली शहर पोलिसांना पाचारण करत तिला पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील रहिवाशी असणाऱ्या या सराईत गुन्हेगार महिलेचे नाव मुमताज परवीन आहे.

Crime : बुरखा परिधान करून सोने-चांदी व्यापाऱ्याला लुटणाऱ्या महिलेचा पर्दाफाश!
धनंजय मुंडे यांचे Facebook अकाउंट हॅक!
Crime : बुरखा परिधान करून सोने-चांदी व्यापाऱ्याला लुटणाऱ्या महिलेचा पर्दाफाश!
प्रणयक्रीडा करणाऱ्या सापांना पकडणं जीवावर बेतलं; सर्पदंशाने तरूणाचा मृत्यू!

मुमताज परवीनचे चोरी करण्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे, डोळ्याला चष्मा तोंडावर बुरखा राहणीमान एकदम स्टॅंडर्ड आणि गर्दी असलेले सोन्या चांदीचे दुकान तिच्या टारगेटवर असे असायचं. सराफा दुकानात जाऊन दुकानातील कामगारांना अनेक मौल्यवान वस्तूची मागणी मुमताज करायची आणि त्याच वेळी योग्य संधी साधत हातचलाखी करून, लाखोंचा सोन्याचा ऐवज काही क्षणात लंपास करायची. मात्र मुमताज परवीनचीच कॉपी करत, हिंगोलीतील सराफ व्यावसायिक सुधीर आप्पा सराफ यांनी, स्वतःच्या दुकानात चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने, दुकानातील सर्व कामगारांना अलर्ट करत, पोलिसांच्या अगोदरच या महिलेला जेरबंद करत विशेष कामगिरी करून दाखवली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com