Nanded : रझा अकादमीच्या आयोजकांसह, हिंसाचार करणाऱ्या 400 जणांवर गुन्हे; 50 अटकेत
Nanded : रझा अकादमीच्या आयोजकांसह, हिंसाचार करणाऱ्या 400 जणांवर गुन्हे; 50 अटकेतSaamTV

Nanded : रझा अकादमीच्या आयोजकांसह, हिंसाचार करणाऱ्या 400 जणांवर गुन्हे; 50 अटकेत

त्रिपुरा येथे मशिदीची विटंबना केल्याच्या कथित प्रकरणावरुन राज्यात ठराविक मुस्लीम संघटनांनी (Muslim organizations) मोर्चे काढले होते आणि त्या मोर्चां दरम्यान मोठा हिंसाचार आणि दगडफेक झाली होती.

नांदेड : त्रिपुरा (Tripura) येथे मशिदीची (Mosque) विटंबना केल्याच्या कथित प्रकरणावरुन राज्यात ठराविक मुस्लीम संघटनांनी मोर्चे काढले होते आणि त्या मोर्चांदरम्यान मोठा हिंसाचार आणि दगडफेक झाली होती. अशाच प्रकारची दगडफेक नांदेडमध्ये (nanded) देखील झाली होती याच दगडफेकीच्या घटनेला जबाबदार असणाऱ्या जवळपास 400 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Crimes against 400 people involved in violence, including the organizers of the Raza Academy)

हे देखील पहा -

यामधील 83 आरोपी निष्पन्न झाले असून आतापर्यंत 50 आरोपींना अटक करण्यात आली असून रझा अकादमीच्या (Raza Academy) आयोजकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसचं व्यासपीठावरुन प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांवर ही कारवाई करणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय कुमार (Additional Director General of Police Sanjay Kumar) यांनी दिली.

Nanded : रझा अकादमीच्या आयोजकांसह, हिंसाचार करणाऱ्या 400 जणांवर गुन्हे; 50 अटकेत
सावधान ! पुणे - मुंबई महामार्गावर प्रवास करताय, मग गाडीची हवा तुम्हीच तपासा; नाहीतर फसाल

दरम्यान दगडफेकीच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेला बंद रद्द झाला असला तरीही आज पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव बंदोबस्त वाढवला असल्याची माहिती देखील संजय कुमार यांनी दिली आहे. शिवाय उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आले आले आहे. नांदेडमधील दगडफेक प्रकरण आणि आजच्या बंदचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय कुमार नांदेड मध्ये आले असताना त्यांनी सदरची माहिती दिली.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com