ज्यांच्या भावना नालायक, तेच नालायका सारखे बोलतात; अब्दुल सत्तारांची प्रवीण दरेकरांवर टीका

प्रवीण दरेकर यांच्या बोलण्यामध्ये कितपत तथ्य असतं हे देखील सर्वांना माहीत आहे.
ज्यांच्या भावना नालायक, तेच नालायका सारखे बोलतात; अब्दुल सत्तारांची प्रवीण दरेकरांवर टीका
ज्यांच्या भावना नालायक, तेच नालायका सारखे बोलतात; अब्दुल सत्तारांची प्रवीण दरेकरांवर टीकाSaamTV

बुलढाणा : राज्यात होत असलेले महिलांवरील (women) अत्याचार याला सर्वस्वी जबाबदार हे नालायक महाविकास आघाडी सरकार (MVA Goverment) असल्याचं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी पुणे येथे केलं होतं. दरेकरांच्या याच वक्तव्यावरती पलटवार करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले "ज्या लोकांच्या भावना नालायक असतात ते नालायक सारखेच बोलतात, त्यांना चांगलं बोलणं येतच नाही, आणि प्रवीण दरेकर यांच्या बोलण्यामध्ये कितपत तथ्य असतं हे देखील सर्वांना माहीत आहे" (Criticism of Abdul Sattar on Praveen Darekar)

हे देखील पहा-

मात्र महिलांवरील अत्याचाराच्या घडत असलेल्या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत, त्या घटना महाराष्ट्रात घडायला नको, अशा भावना देखील यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केल्या तसेच नुकत्याच घडलेल्या निर्भया अत्याचाराच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी (CM) त्या कुटुंबाची जबाबदारी उचलून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात (Fast track court) चालवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी DG ला दिले आहेत, असेही अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी यावेळी सांगितलं.

ज्यांच्या भावना नालायक, तेच नालायका सारखे बोलतात; अब्दुल सत्तारांची प्रवीण दरेकरांवर टीका
BJP vs Shivsena : असे कितीही सोमय्या आले तरी शिवसेना संपणार नाही; अब्दुल सत्तारांचा घणाघात

मंत्री सत्तार हे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यात अतिवृष्टीने (Heavy Rain) झालेल्या नुकसानीचे पाहणी करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आले होते त्यावेळी ते बोलत होते, सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून सर्वच प्रकारचा सर्वे करून अहवाल पाठविण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत, यावेळी त्यांच्यासोबत खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, आमदार संजय रायमुलकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष जालींदर बुधवत, यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com