Sangli : १४ फुटी मगर दिसताच तरुणांनी केलं धाडस, पण...

ही मृत मगर एक दीड किलोमीटर उचलून वाहनापर्यंत वनविभागाने आणली.
sangli, crocodile, river
sangli, crocodile, riversaam tv

Sangli : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथे कृष्णा नदीकाठी १४ फुटी मृत मगर आढळून आली. त्यामुळं या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही मगर (crocodile) सुमारे पंधरा वर्षाच्या पुढची असल्याची शक्यता वर्तवली गेली. त्यामुळे मगरीचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. (Sangli Latest Marathi News)

शेतीच्या कामासाठी बुधवारी सकाळी काही शेतकरी नदीकाठी गेले असता त्यांना ही मगर दिसून आली. या मगरीचा व्हिडीओ काहींनी केला. काही काळ मगरीची कोणतेही हालचाल दिसून न आल्याने शेतक-यांनी वन विभागास याची माहिती कळविली.

sangli, crocodile, river
Breaking News : येरवड्यातील कैद्यांचा पाेलिसांवर जीवघेणा हल्ला

दरम्यान या परिसरात नेहमीच मगरीचा वावर असल्याने उन्हासाठी ही मगर काठावर पडली असेल असेही शेतक-यांना वाटले. परंतु बराचवेळ काहीही हालचाल दिसून न आल्याने घटनास्थळावर उपस्थित असलेल्या धाडसी तरुणांनी जवळ जाऊन पाहिले. त्यावेळी त्यांना मगरीचे एक पाऊल व जबडा जखमी असल्याचे निदर्शनास आले.

sangli, crocodile, river
Sangli : अपहरण झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचा वारणेच्या नदीपात्रात सापडला मृतदेह

वनविभागाचे अधिकारी युवराज पाटील, वनरक्षक इकबाल पठाण आणि कर्मचारी नदी काठी आले. त्यांनी पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून मगर मृत झाल्याची खात्री केली. ही मगर मादी जातीची आहे. ती जखमी झाल्याने क्षीण होऊन मृत झाल्याचे अधिका-यांनी सांगितलं.

sangli, crocodile, river
Chiplun : प्रशासनानं वाशिष्ठी नदी काठच्या गावांना दिला सतर्कतेचा इशारा

ही मृत मगर एक दीड किलोमीटर उचलून वाहनापर्यंत वनविभागाने आणली. त्यानंतर कुपवाड येथे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अहवाल आल्यावरच मगरीचा मृत्यू कशामुळं झाला हे समजू शकेल असं वन विभागाने सांगितलं.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com