धुळीमुळे पिकांचे नुकसान; शेतकरी त्रस्त
धुळीमुळे पिकांचे नुकसान; शेतकरी त्रस्तविश्वभुषण लिमये

धुळीमुळे पिकांचे नुकसान; शेतकरी त्रस्त

शेतकऱ्याला नैसर्गिक संकटाबरोबरच आता शेजारी असलेल्या सिमेंट फॅक्टरीचा सामना करावा लागत आहे

सोलापूर : शेतकरी अनेक संकटांचा सामना करून, कवडीमोल पीक पदरात पाडण्यासाठी धडपड करत असलेली अनेक उदाहरणे बघायला मिळत आहेत. अशीच धडपड करणाऱ्या शेतकऱ्याला नैसर्गिक संकटाबरोबरच आता शेजारी असलेल्या सिमेंट फॅक्टरीचा सामना करावा लागत आहे. सिमेंट कंपनीतून येणाऱ्या डस्टमुळे इथल्या शेतकऱ्याला वर्षाकाठी किमान एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.

हे देखील पहा-

शेतकऱ्यांच्या या नुकसानीची ही कहाणी आहे. दक्षिण सोलापुर तालुक्यातील होटगी स्टेशन येथील शेतकरी दिलीप सुरवसे यानी त्यांची या ठिकाणी 16 एकर शेती असून, शेतात कोणतेही पीक घ्यायचे म्हंटले तरी प्रत्येक पिकाला सिमेंट फॅक्टरीतुन येणाऱ्या डस्टचा सामना करावा लागत आहे. पिकावर पडणाऱ्या डस्टमुळे शेतातील पिकाचे उत्पन्न घटत आहे. त्यामुळे सुरवसे यांचे किमान एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान होतं आहे.

धुळीमुळे पिकांचे नुकसान; शेतकरी त्रस्त
शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक घोटाळा; सातारा येथून एकास अटक

दिलीप सुरवसे यांनी सिमेंट कंपनीतून येणाऱ्या डस्ट बाबत वारंवार जिल्हाधिकारी, प्रदूषण मंडळ आणि संबंधित सिमेंट कंपनीकडे तक्रार केली आहे. 2017 सालापासून ते आजतागायत तक्रार आणि अर्ज करून कंपानीने आपल्या कॅम्पस बाहेर डस्ट जावु नये, अशी व्यवस्था करण्याची मागणी ते करत आहेत. मात्र, कुणीच या प्रकरणाची दखल घेत नसल्याने ते हताश झाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com