Beed Latest News: कृषिमंत्र्यांच्या बीडमध्ये शेतकऱ्यांचा पीक विमा लाटतंय कोण? चक्क नगरपालिकेच्या जागेवर 6 हजार हेक्टरचा पीक विमा

Beed Latest News: कृषिमंत्राच्या बीड जिल्ह्यात बोगस पिक विमा लाटणारे रॅकेट सक्रिय असल्याचे समोर आले आहे.
Beed News
Beed NewsSaam tv

Beed News:

कृषिमंत्राच्या बीड जिल्ह्यात बोगस पिक विमा लाटणारे रॅकेट सक्रिय असल्याचे समोर आले आहे. बीड नगरपालिकेची जागा शेत दाखवून राज्यांतील 8 जिल्ह्यासह पर राज्यांतील शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्याचे तपासात उघडकीस आले आहे. यामुळे कृषिमंत्र्यांच्या शेतकऱ्यांचा पिक विमा लाटतंय कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Latest Marathi News)

निसर्गाच्या भरोशावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळावे म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना राबवली जात आहे. मात्र, यात काही बोगस पीक विमा लाटणारे रॅकेट सक्रिय असल्याचा प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे.

यामध्ये चक्क नगर परिषदेची, एमआयडीसीची, शासकीय गायरान जमीन, वन विभागाचे जमीन दाखवून तब्बल 30 हजार एकर क्षेत्राचा विमा भरल्याचे तपासात उघडकीस आले आहे. 12 हजार हेक्टर यात 274 संशयास्पद शेतकऱ्यांची नावे कृषी विभाग, महसूल प्रशासन आणि विमा कंपनीने समोर आणले आहेत.

Beed News
Womens Reservation: ७५ % महिला प्रतिनिधींचं काम त्यांचे नवरोबाच पाहतात; महिला आरक्षण विधेयकावर बच्चू कडू बोलले

तसेच अगोदरच दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नावाने बाहेर जिल्ह्यातील बोगस शेतकरी पीक विमावर डल्ला मारत असतील. तसेच जिल्ह्याला बदनाम करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि खऱ्या लाभार्थींना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

या घोटाळ्यासंदर्भात भारतीय पीक विमा कंपनीच्या चौकशीत वेगवेगळी प्रकरणे समोर येत असल्याने पीक विमा घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे. धक्कादायक म्हणजे तेलंगणा राज्यासह छत्रपती संभाजीनगर, जालना, कोल्हापूर, नागपूर व पुणे जिल्ह्यातील व्यक्तींनी बीड नगरपालिकेची जागा शेत दाखवत तब्बल 16 हजार 229 एकरचा पीक विमा उतरवला असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

प्रीमियम 12 कोटी रुपये आणि वीमा देयक रककम तर 60 कोटीच्या घरात जात असल्याचा देखील सांगितलं.

या संपूर्ण प्रकार संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांना विचारले असता. पेरणी क्षेत्र आणि विमा संरक्षण क्षेत्र यामध्ये तफावत आढळून येत असल्याचे विमा कंपनीला आम्ही कळवले आहे. यात विमा कंपनीने स्वतः कारवाई करून अशा शेतकऱ्यांवर चाप बसवला पाहिजे. तसेच पीडित खरे लाभार्थी शेतकरी वंचित राहू नयेत, याची काळजी घ्यावी, असे सूचना देखील केल्याचे त्यांनी सांगितले.

Beed News
Share Market News: गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजारातील आजचा दिवस ठरला काळा, काही तासांतच तब्बल 2.5 लाख कोटी बुडाले...

दरम्यान, राज्यासह बीड जिल्ह्यात 1 रुपयात पीक विमा राज्य सरकार आणि केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या फायद्याची योजना आणली असली तरी यामध्ये शेतकऱ्याच्या नावाने पीक विमा लाटणारी मोठी टोळी सक्रिय आहे. यात पिक विमा कंपनीच्या पोर्टलवरील त्रुटीमुळे असे प्रकार घडत असल्याचे तज्ञांनी सांगितले.

मात्र, जगण्यासाठी एकीकडे संघर्ष करणारा शेतकरी आणि दुसरीकडे त्याच्या नावाने विमा लाटणारे त्यामुळे एकंदरीतच या पीक विमा घोटाळ्याच्या संदर्भात कृषिमंत्री धनंजय मुंडे लक्ष घालून 'दूध का दूध और पानी का पानी' करणार का ? हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com