पंढरपुरात कोरोना काळात राष्ट्रवादीच्या मेळाव्याला गर्दी...

कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे पंढरपुरात पुन्हा कोरोनाचा वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पंढरपुरात कोरोना काळात राष्ट्रवादीच्या मेळाव्याला गर्दी...
पंढरपुरात कोरोना काळात राष्ट्रवादीच्या मेळाव्याला गर्दी...भारत नागणे

पंढरपूर - रेड झोन असलेल्या पंढरपूर Pandharpur तालुक्यातील कासेगाव Kasegaon येथे आज राष्ट्रवादीच्या NCP मेळाव्याला पदाधिकारी व कार्यकत्यांनी मोठी गर्दी केली होती. मेळाव्यामध्ये सोशल डिस्टन्सींगचा Social Distance पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले.

कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे पंढरपुरात पुन्हा कोरोनाचा वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. विधानसभा पोटनिवडणुकी दरम्यान पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात कोटोणबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. याचे परिणाम आजपर्यंत लोकांना भोगावे लागत आहेत.

हे देखील पहा -

सोलापूर जिल्ह्यात आज सर्वाधिक रुग्ण हे पंढरपूर तालुक्यात असताना देखील पक्षाच्या मेळाव्याला मोठी गर्दी होत असल्याने पोलीस काय कारवाई करणार याकडे आता सर्व्यांचे लक्ष लागलेले आहे.पंढरपूर तालुक्यातील कासेगाव आणि परिसरात जवळपास 20 हून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे.

पंढरपुरात कोरोना काळात राष्ट्रवादीच्या मेळाव्याला गर्दी...
पर्यटकांनाे! कास पुष्प पठारात गव्यांचा कळप दिसल्यास 'हे' करा

कासेगाव हे रेड झोन मध्ये असताना देखील याच गावांमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. सभा आणि मेळाव्यामुळे पंढरपुरात कोरोना वाढल्याचे ताजे उदाहरण असताना देखील पुन्हा पक्षाचे पदाधिकारी कधी धडा घेणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com