वाशिमच्या बाजारपेठेत गणेश मूर्ती आणि पूजेच्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी

पुजेसाठी लागणारे सर्व साहित्य आणण्यासाठी बाजारपेठाही फुलल्या आहेत मात्र नागरिकांना कोरोनाचा विसर पडला आहे.
वाशिमच्या बाजारपेठेत गणेश मूर्ती आणि पूजेच्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी
वाशिमच्या बाजारपेठेत गणेश मूर्ती आणि पूजेच्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दीगजानन भोयर

वाशिम : वाशिम (Washim) बाजारपेठेत आज गणेश मूर्ती आणि पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी (Crowd) दिसून आली आहे. प्रत्येतजण आपआपल्या बाप्पांचे आगमन घरोघरी करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही अनेक मंडळांनी श्रीची स्थापना न करण्याचा निर्णय घेतला आहे.(Crowd of citizens to buy materials for Ganeshotsav)

हे देखील पहा-

गणेशोत्सव म्हणल की सर्वच वयोगटातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह असतो आणि त्या उत्साहातच बाप्पांच्या स्वागतासाठी लागणारे, पुजेसाठी लागणारे सर्व साहित्य आणण्यासाठी बाजारपेठाही फुलल्या आहेत मात्र नागरिकांना कोरोनाचा विसर पडला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

वाशिमच्या बाजारपेठेत गणेश मूर्ती आणि पूजेच्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी
सरकारच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करुया; बाळासाहेब पाटलांचे गणेशभक्तांना आवाहन

जिल्हा प्रशासनाने मंडळ न उभारता घरीच गणपतीची स्थापना करावी असे आवाहन केले होते. या प्रशासनाच्या आवाहनाला जिल्ह्यातील गणेश मंडळांनी प्रतिसाद दिल्याचे पहावयास मिळत आहे. मात्र गणेशमूर्ती आणि पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याटी खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून आली आहे. अनेकांच्या चेहऱ्यावर नसल्याने सोशल डिस्टंसिंगचा मात्र फज्जा उडाल्याचे चित्रं बघावयास मिळात आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com