ओव्हरफ्लो झालेल्या उतावळी धरणावर पर्यटकांची गर्दी; सुरक्षेअभावी जीवितहानीची शक्यता

बुलढाणा जिल्ह्यातील उतावळी धरण ओहरफ्लो झाले आहे. या धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र धरणावर सुरक्षा नसल्याने जीवितहानी होण्याची शक्यता वाढली आहे.
ओव्हरफ्लो झालेल्या उतावळी धरणावर पर्यटकांची गर्दी; सुरक्षेअभावी जीवितहानीची शक्यता
ओव्हरफ्लो झालेल्या उतावळी धरणावर पर्यटकांची गर्दी; सुरक्षेअभावी जीवितहानीची शक्यतासंजय जाधव

बुलढाणा: सततच्या पावसाने मेहेकर तालुक्यातील देउळगावसाखरशा या गावानजिक असलेला मध्यम प्रकल्प उतावळी धरण ओहरफ्लो झाला असून धरणातील पानी सांडव्यावरुन वाहत आहे. धरण पाहणाऱ्यांची गर्दी वाढली असून सांडव्या वरील पाण्यात जाऊन नागरिक फिरताना दिसत आहेत. (Crowds of tourists on the overflowing dam; Possibility of loss of life due to lack of security)

हे देखील पहा -

कोरोना अजुन संपला नाही मात्र सर्व नियम धाब्यावर ठेवून नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या उतावळी धरणावर कुठेही सुरक्षा गार्ड दिसला नाही. मागील वर्षी अपघात होऊन धरणात 3-4 जण बुडाले होते त्यावेळीही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता आता यावर्षीसुद्धा गर्दी वाढत आहे.

ओव्हरफ्लो झालेल्या उतावळी धरणावर पर्यटकांची गर्दी; सुरक्षेअभावी जीवितहानीची शक्यता
मोठ्या भावाला वाचवताना लहान भाऊ गेला वाहून; लहान भाऊ अद्यापही बेपत्ता...

खामगाव येथील चारजण उतावळी धरणावर काल सायंकाळी पोहायला गेले असता त्यातील एकजण बुडाला आहे. त्याचा मृतदेह अद्यापही मिळालेला नसून शोध सुरु आहे. धरणावर तातडीने सुरक्षागार्ड नेमने आवश्यक असून धरणावर जाण्यास प्रतिबंध करावा अशी मागणी नागरिक करीत आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com