दुर्दैवी : रस्त्यावरील खड्याने घेतला देशाच्या जवानाचा बळी

देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून, कठोर परिश्रम व मेहनत घेऊन केंद्रीय सशस्त्र सीमा दलात नियुक्त झालेल्या जवानाचा रस्त्यावरील खड्ड्याने बळी घेतल्याची दुर्दैवी घटना हिंगोली जिल्ह्यात घडली आहे
दुर्दैवी : रस्त्यावरील खड्याने घेतला देशाच्या जवानाचा बळी
भानुप्रसाद पप्पाला- Saam TV

हिंगोली : देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून, कठोर परिश्रम व मेहनत घेऊन केंद्रीय सशस्त्र सीमा दलात नियुक्त झालेल्या जवानाचा रस्त्यावरील खड्ड्याने Pothole बळी घेतल्याची दुर्दैवी घटना हिंगोली Hingoli जिल्ह्यात घडली आहे. CRPF Jawan Killed due to road pothole

भानूप्रसाद पप्पाला असे या खड्ड्याने बळी घेतलेल्या जवानाचे नाव असून ते मूळचे आंध्र प्रदेशातील Andhra Pradesh रहिवाशी आहेत. 35 वर्षीय भानुप्रसाद हे मागील वर्षभरापासून हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात असलेल्या केंद्रीय सशस्त्र सीमा बलाच्या CRPF प्रशिक्षण केंद्रात कॉन्स्टेबल या हुद्यावर नियुक्त होते.

हे देखिल पहा-

आज पहाटे सव्वा तीन वाजता , प्रशिक्षण केंद्रातील डॉक्टरांना नांदेड रेल्वे स्थानकावरून आणण्यासाठी भानुप्रसाद आपले सहकारी कान्हाराम यांना घेऊन चारचाकी वाहनातून निघाले होते. मात्र हिंगोली नांदेड महामार्गावरील डोंगरकडा ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात त्यांची चार चाकी आदळली.CRPF Jawan Killed due to road pothole

या वेळी या जवानांसोबत असलेल्या रायफल मधून धक्क्याने एक गोळी झाडली गेली. ती थेट भानुप्रसाद यांच्या छातीत घुसली. अचानक घडलेल्या या घटनेत भानुप्रसाद गाडी मध्येच कोसळले. यानंतर सोबत असलेल्या कान्हाराम यांनी त्यांना धीर देत, याची माहिती प्रशिक्षण केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.

भानुप्रसाद पप्पाला
लातूर DCC त सत्तेत आल्यानंतर आमदार धीरज देशमुख म्हणाले...!

या नंतर तातडीने बाळापूर पोलीस व सशस्त्र सीमा बलाच्या अधिकाऱ्यांनी जखमी भानुप्रसाद यांना नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचार सुरू करण्याआधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, या घटनेमुळे संपूर्ण प्रशिक्षण केंद्र व परिसरावर शोककळा पसरली असून सरकारच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावरील खड्ड्याने देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या जवानांचा बळी घेतला आहे.

Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com