दगडफेकीनंतर दारव्हात जमावबंदी लागू, शहरात तणावपूर्ण शांतता

दारव्हा येथील दिग्रस मार्गावर दारू प्रशासन करून धिंगाणा घालत असल्याच्या कारणावरून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
दगडफेकीनंतर दारव्हात जमावबंदी लागू, शहरात तणावपूर्ण शांतता
दगडफेकीनंतर दारव्हात जमावबंदी लागू, शहरात तणावपूर्ण शांततासंजय राठोड

संजय राठोड

यवतमाळ - दारव्हा येथील दिग्रस Digras मार्गावर दारू Alcohol प्रशासन करून धिंगाणा घालत असल्याच्या कारणावरून पोलिसांनी Police तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्यापैकी एकाचा मंगळवारी रात्री उशीरा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत तरुणांचा मृत्यू झाला असा आरोप करित जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. त्यात तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे दारव्हा Darwha शहरात तणाव निर्माण झाला. Curfew imposed in Darwha after stone pelting

हे देखील पहा -

दारव्हा येथील ३० वर्षीय युवकांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप करित जमावाने पोलीस स्टेशन वर दगडफेक केली. यात तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यवतमाळ, अमरावती, बुलढाणा आणि वाशीम येथून ९०० पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्ता करिता शहरात पाचारण करण्यात आले. मृतक इमरान शेख यांचा दफनविधी पोलीस बंदोबस्तात बुधवारी रात्री आठ वाजता करण्यात आला आहे. दारव्हा शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांनी जमावबंदीचा आदेश शहरात लागु केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com