नाशकात जमावबंदी लागू; पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 23 सप्टेंबरपर्यंत नाशिक शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आली आहे.
नाशकात जमावबंदी लागू; पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी
नाशकात जमावबंदी लागू; पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी Saam Tv

नाशिक: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 23 सप्टेंबरपर्यंत नाशिक शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी जारी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. पाच अथवा पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी असणार आहे. गणेश मूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. रात्री उशिरा आदेश जारी केले आहेत.

नाशकात जमावबंदी लागू; पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी
नाशिक, जळगावात महापुरानंतर मंत्र्यांचे केवळ दौरे; शेतकऱ्यांना मदत कधी?

महाराष्ट्रात सध्या सर्वत्र गणपती उत्सव आनंदात आणि उत्सहात साजरा होतोय. त्याला गालबोट न लागता आणि कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा वाढू नये म्हणून राज्य सरकारच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. तिसऱ्या लाटेचे संकेत देण्यात आलेले आहेत त्यामुळे जपून पावलं टाकणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी सध्या आटोक्यात आली आहे. परंतू गर्दी होवून पुन्हा कोरोनाचा उद्रेक होऊ नये म्हणून राज्यात गणपतीसाठी कडक नियम लावण्यात आले आहेत.

दरम्यान काल राज्यात ४,५२४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर सध्या महाराष्ट्रात ४९,८१२ रुग्ण अॅक्टीव आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५ टक्के आहे. राज्यात कोरोना लसीकरण देखील वेगाणे सुरु आहे. काल राज्यात ९ लाखांच्या वर लसीकरण झाले.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com