
- सचिन बनसाेडे, सुशिल थाेरात
Maharashtra Graduate Constituency Election : विधानपरिषदेच्या पदवीधर (Graduate Constituency Election) आणि शिक्षक मतदारसंघाच्या (Teachers Constituency Election) पाच जागांसाठी आज (साेमवार) उत्साहात मतदान सुरु आहे. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात संपूर्ण दुपारी दोनपर्यंत 31.71 टक्के मतदान झाले आहे. दुपारनंतर मतदानाचा वेग काहीसा वाढला असून काही मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली. येत्या दाेन फेब्रुवारीला मतमाेजणी हाेणार असून यंदाच्या निवडणुकीत (election) काेण जिंकले ते त्यादिवशी स्पष्ट हाेणार आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पालकमंत्री दादा भुसे (dada bhuse) यांना मतदान करता आले नाही. दादा भुसे हे मतदानापासून वंचित राहिले. प्राप्त माहितीनूसार मतदाराला दरवर्षी मतदान यादीत नाव समाविष्ट करावे लागते. मात्र यावेळी दादा भुसेंकडून त्यांचा नावाचा यादीत समावेश केला गेला नाही. दरम्यान शिवसेना शिंदे गटाने सत्यजित तांबे यांना मदत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे भुसे यांनी माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले. (Maharashtra News)
या (nashik) मतदारसंघात भाजप खासदार सुजय विखे पाटील (sujay vikhe patil) हे मतदानापासून वंचित राहिल्याची चर्चा आहे. नगरच्या मतदार यादीत त्यांचे नाव नसल्याचे समोर आले आहे. विखे यांच्या नाव नोंदणीबाबत स्पष्टता नाही. भूमीपुत्राच्या मुद्यावरून सत्यजित तांबेंना सुजय विखेंनी दिले होते थेट समर्थन. मात्र खासदार सुजय विखेंचेच नाव मतदार यादीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत काही कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता त्यांनी नगर जिल्ह्यातील ऑनलाइन यादीत सुजय विखे नावाचा एकच मतदार असल्याचे दिसून येत आहे. सुजय दिगंबर विखे नावाचा एकच मतदार यादीत दिसत आहे. तसेच यादीत भाजपचे खासदर सुजय विखे यांचे नाव नसल्याचेही कार्यकर्त्यांनी नमूद केले. दरम्यान नगर जिल्ह्यात दुपारी दोन वाजेपर्यंत वाजेपर्यंत 32.55 टक्के इतके मतदान झाले असून 28478 पुरुष तर 9163 महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवला आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.