Dadaji Bhuse: मिळालेल्या मंत्रीपदावर नाराज नाही; दादा भुसे यांनी स्पष्टच सांगितले

मिळालेल्या मंत्रीपदावर आपण समाधानी असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे.
dada bhuse
dada bhusesaam tv

धुळे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंडाळीनंतर मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. शिंदे गटामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलले आहे. शिंदे गटाच्या बंडाळीनंतर तब्बल ३८ दिवसांपेक्षा अधिक दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. त्यानंतर आता साऱ्या जनतेचे लक्ष शिंदे सरकारमध्ये कोणाला कुठलं खातं मिळेल, याकडे लागले होते. जनतेचे लक्ष लागलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले. यावर आता मंत्री दादा भुसे (Dadaji Bhuse) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हे देखील पाहा -

राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे आज धुळे दौऱ्यावर ध्वजारोहणासाठी आले असता त्यांना या मंत्रिमंडळामध्ये हलके मंत्रीपद मिळाले असल्याबाबत ते नाराज असल्या संदर्भात विचारणा करण्यात आली यावर मंत्री दादा भुसे यांनी आपण मिळालेल्या मंत्रीपदावर नाराज नसल्याचे स्पष्ट सांगत आपल्या मागणीनुसारच हे मंत्री पद मिळाले असल्याचे सांगितले आहे.

dada bhuse
PM Modi Speech: पंतप्रधान मोदींनी देशाला दिले पंच प्रण

यापूर्वी मिळालेल्या कृषी विभागात काम करत असताना वारंवार होणारा प्रवास वारंवार अवकाळी पावसामुळे प्रत्येक ठिकाणी नुकसानी संदर्भात पोहोचताना होणारा त्रास लक्षात घेता, आपणच हे खातं नको असे माजी मुख्यमंत्र्यांना पण सांगितले होते व आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना देखील सांगितले असल्याचे स्पष्ट करत मिळालेल्या मंत्रीपदावर आपण समाधानी असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com