काेकणवासियांनाे! दक्षिण मांड नदीवरील पूल वाहतुकीस झाला खुला

काेकणवासियांनाे! दक्षिण मांड नदीवरील पूल वाहतुकीस झाला खुला
Dakshin Maand River Bridge

- जगन्नाथ माळी

उंडाळे (जि. सातारा) : कऱ्हाड ते रत्नागिरी राज्यमार्गावरील उंडाळेनजीकचा दक्षिण मांड नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. चार महिन्यांनंतर आज सायंकाळी चारच्या सुमारास पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे वाहनचालक, प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. (dakshin-mannd-river-bridge-reopen-for-transportation-karad-ratnagiri-highway-satara-news)

कऱ्हाड चांदोली रस्त्याचे युनिटी हायब्रीड योजनेतून नूतनीकरण रुंदीकरण करण्यात येत आहे. हा रस्ता पाचवड फाटा ते शेडगेवाडीपर्यंत अंतिम टप्प्यात आला आहे. कऱ्हाड तालुक्याच्या हद्दीपर्यंत तो रस्ता पूर्ण झाला असून, रस्ता करताना रस्त्यावरील पुलाची कामेही करण्यात आली आहेत. यामध्ये अनेक फरशी पुलांचा समावेश आहे.

कऱ्हाड तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा व कोकणाला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणून पाचवड फाटा, उंडाळे, शेडगेवाडी फाटा यामार्गे कोकणात जाण्यासाठी सोयीचा ठरणाऱ्या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून चालू आहे. यामध्येच ओंड, उंडाळे या दोन गावांमधील दक्षिण मांड नदीवरील पुलाचे काम गेल्या पाच महिन्यांपासून सुरू होते. ५० कामगारांनी दिवसरात्र सत्रामध्ये काम सुरू ठेऊन ठेकेदाराने कमी कालावधीमध्ये पुलाचे काम पूर्ण केले.

Dakshin Maand River Bridge
साता-यात वैद्यकीय अधिका-यांनी तृतीयपंथीयांपुढे हात जाेडले

हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला. हायब्रीड युनिटी प्रोजेक्ट अंतर्गत रस्त्याचे रुंदीकरणाबरोबर सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे. दक्षिण मांड नदीवरील पुलाचे काम अत्यंत सुलभ व मजबूत झाले आहे. पूर्णपणे काँक्रिट व स्टील वापरून काम पूर्ण करण्यात आले आहे. जुन्या पुलापेक्षा नवीन पुलाची रुंदी वाढवून रुंदी १३ व लांबी ३३ मीटर, तर उंची नऊ मीटर केली आहे. त्यामुळे पुलावरती एक वेळेला तीन वाहने आरामात पास होतील, अशा पद्धतीने त्यांचे डिझाइन बनवण्यात आले आहे.

सध्या पावसाळा सुरू झाला आहे. पर्यायी रस्ताही खराब असल्याने आता पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सध्या पुलापासून २४० मीटर रस्ता डांबरीकरण करण्याचे शिल्लक आहे, तसेच संरक्षक बॅरियल बसवण्याचे काम शिल्लक आहे. येत्या पंधरा दिवसांत उर्वरित काम होईल असे सांगण्यात आले. पुलावरून वाहतूक सुरू झाल्यामुळे वाहनधारकातून, प्रवासी यामधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

Dakshin Maand River Bridge
उद्धवा! अजब तुझे सरकार... बंडातात्यांच्या सुटकेसाठी वारक-यांचा मुख्यमंत्र्यांवर 'राग'
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com