Kolhapur: भुदरगडमधील बंधारा फुटला; महिलेचा मृत्यू... (पहा व्हिडीओ)

कोल्हापूर जिल्ह्यामधील भुदरगड तालुक्यात असलेल्या मेघोली लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या भिंतीला गळती झाल्यामुळे रात्री उशिरा बंधारा फुटल्याची माहीती मेघोली ग्रामस्थांनी दिली आहे.
Kolhapur: भुदरगडमधील बंधारा फुटला; महिलेचा मृत्यू... (पहा व्हिडीओ)
Kolhapur: भुदरगडमधील बंधारा फुटला; महिलेचा मृत्यू... (पहा व्हिडीओ)संभाजी थोरात

संभाजी थोरात

कोल्हापूर: कोल्हापूर Kolhapur जिल्ह्यामधील भुदरगड Bhudargad तालुक्यात असलेल्या मेघोली लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या भिंतीला गळती झाल्यामुळे रात्री उशिरा बंधारा फुटल्याची माहीती मेघोली ग्रामस्थांनी दिली आहे. बंधाऱ्याच्या आउटलेट Outlet शेजारून बंधारा फुटल्याच ग्रामस्थांनी सांगितलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हा लघू पाटबंधारे Minor Irrigation प्रकल्प आहेत. तर पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने एका महिलेचा मृत्यू Death झाला आहे. तर शेकडो एकर शेतजमीन वाहून गेली आहे. दरम्यान या प्रकल्पातील पाण्यामुळे आता वेदगंगा नदीच्या Vedganga River पाणी पातळीत वाढ होऊ शकते. वाढत्या पाण्यामुळे वेदगंगा नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर काल रात्री या बंधार्‍यातून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं.

Kolhapur: भुदरगडमधील बंधारा फुटला; महिलेचा मृत्यू... (पहा व्हिडीओ)
Breaking - बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाचे निधन

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी भुदरगड तालुक्यातील मेघोली परिसराला भेट देऊन पाहणी केली आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com