'आया है राजा लोगो रे लोगो..' हातात तलवार घेऊन व्हिडीओ बनवणे पडले महागात!
'आया है राजा लोगो रे लोगो..' हातात तलवार घेऊन व्हिडीओ बनवणे पडले महागात!विश्वभूषण लिमये

'आया है राजा लोगो रे लोगो..' हातात तलवार घेऊन व्हिडीओ बनवणे पडले महागात!

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे काल कांही तरुणांनी हातात तलवार घेऊन व्हिडिओ बनवल्याप्रकारणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर: दक्षिण सोलापूर South Solapur तालुक्यातील वळसंग Valsang येथे काल कांही तरुणांनी हातात तलवार Sward घेऊन व्हिडिओ बनवल्याप्रकारणी गुन्हा Crime दाखल करण्यात आला आहे. यामध्ये यासीन कटरे, सोहेल कटरेसहा इतर सहा आरोपीवर वळसंग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

कोविड Covid संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदीचा Curfew आदेश लागू आहेत. त्यात या आठ तरुणांनी हातात तालावर घेऊन व्हिडिओ Video बनवल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सर्व तरुणांनी मिळून 'आया रे राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूमलो झूमलो' या गाण्यावर हातात तालावर घेऊन व्हिडीओ क्लिप Clip तयार केल्याने जनसामान्यात दहशत निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

'आया है राजा लोगो रे लोगो..' हातात तलवार घेऊन व्हिडीओ बनवणे पडले महागात!
Ahmednagar: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळेंवर विनयभंगाचा गुन्हा

दरम्यान, या आठ ही जणांविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता विधान कलम 144 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37(1), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com