अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी !

रायगडाला आज मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. सुधागड तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडली आहे.
अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी !
अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी !राजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड : रायगडाला आज मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. सुधागड तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने खोपोली-वाकण या राष्ट्रीय महामार्गावरील पाली, जांभूळ पाडा येथील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती.

अंबा नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने भैरव रस्ता रहदारी करता बंद करण्यात आला. तसेच जांभुळ पाडा ते कळंब, जांभुळपाडा ते माणगाव बुद्रुक रस्ता देखील रहदारीसाठी बंद केल्याची माहिती तहसीलदार रायन्नावार यांनी दिली असून प्रशासनाने नदी किनाऱ्यावर असणाऱ्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

पाली व जांभुळपाडा येथे खोपोली-वाकण रोडवर अंबा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. पुलावरून पाणी जात असल्याने पाली अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी !
बीडमध्ये पती-पत्नीची आत्महत्या!

या ठिकाणावरून येणाऱ्या प्रवाश्यांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मुसळधार पाऊस सुरू झाला की दरवर्षी पाली व जांभुळ पाडा येथील जुन्या पुलावरून पाणी जाऊन रस्ता वाहतुकीस बंद होतो. त्यामुळे नवीन पुलाचे बांधकाम कधी पूर्ण होणार आणि पावसाळ्यातील हा त्रास कधी थांबणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Edited By : Kushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com