Weather : राज्यात मुसळधार पावसाचा धोका; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

गेल्या 4- 5 दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने चांगलीच हजेरी लावली
Weather : राज्यात मुसळधार पावसाचा धोका; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा
Weather : राज्यात मुसळधार पावसाचा धोका; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशाराSaam Tv

मुंबई : मागील आठवड्यापासून राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झाले आहे. यामुळे गेल्या 4- 5 दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार heavy rainfall पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यानंतर आता हवामान खात्याने IMD पुढील 48 तासांसाठी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज केवळ ८ जिल्हे वगळता राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची Rain in maharashtra शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उद्या देखील राज्यात कमी अधिक प्रमाणात राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने आज कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला, परभणी आणि नांदेड हे ८ जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी वेगवान वाऱ्याच्या साथीने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे देखील पहा-

विदर्भातील वाशीम, यवतमाळ, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरी कोसळणार आहेत. संबंधित जिल्ह्यांत राहत असणाऱ्या नागरिकांना हवामान तज्ज्ञांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच आकाशात विजा चमकत असताना, घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उद्या देखील राज्यात कमी- अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे.

उद्या जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे ७ जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे. उद्या पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानतंर राज्यात हळुहळू पावसाचा जोर कमी होणार आहे. तर विकेंडला परत राज्यातून मान्सून गायब होण्याची शक्यता आहे.

Weather : राज्यात मुसळधार पावसाचा धोका; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा
ऊस वाहतूक दरात वाढ करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचा पंढरपुरात ट्रॅक्टर मोर्चा

हवामान विभागाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पूर्व राजस्थान आणि लगतच्या मध्य प्रदेशाच्या काही भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच बंगालचा उपसागर आणि उत्तर ओडिशा- पश्चिम बंगाल- बांगलादेश किनारपट्टीवर चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. पण येणाऱ्या काळात बंगालच्या उपसागरातील चक्रीय वाऱ्याची स्थिती मंदावणार आहे. यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com