पुराच्या पाण्यात पडताहेत धोकादायक उड्या...!

अकोल्यामधील मुंडगाव या गावामध्ये तरुणाईसह मुलांचा पुराच्या पाण्यात पोहण्याचा आनंद..
पुराच्या पाण्यात पडताहेत धोकादायक उड्या...!
पुराच्या पाण्यात पडताहेत धोकादायक उड्या...!जयेश गावंडे

जयेश गावंडे

अकोला : अकोल्यामधील Akola मुंडगाव Mundgaon या गावामध्ये तरुणाईसह मुलांचा पुराच्या पाण्यात पोहण्याचा आनंद.. तर दुसरीकडे केवळ सोशल मीडियावरील Social media दिखावूपणा करण्यासाठी धोकादायक उड्या पुराच्या पुलावरून टाकल्या जात आहेत.

हे देखील पहा-

यामुळे हा प्रश्न प्रशासनासाठी administration तसेच पालकांसाठी चिंतेची बाब बनली आहे. अकोट Akot तालुक्यामधील मुंडगाव येथील चंद्रिका नदीला River आलेल्या, पुराच्या पाण्यात अनेक तरुणांसह मुलांनी पुलावरून उड्या मारत पोहण्याचा आनंद लुटला होता. त्यांचे हे साहस पाहण्यासाठी नागरिकांची गर्दीही होत होती. दरम्यान, पुलावरून तरुणांसह मुले पुराच्या पाण्यात उड्या मारत असताना, प्रशासकीय यंत्रणेकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

पुराच्या पाण्यात पडताहेत धोकादायक उड्या...!
पुराच्या भीषण काळोखात जनजीवन विस्कळीत

रोखण्यासाठी कोणतीही यंत्रणा याठिकाणी उपलब्ध नाही. आपत्ती निवारस केंद्राकडून त्यांच्या चौकटीतील कार्य सुरू असले तरी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून अशा उड्या रोखणे गरजेचे आहे. पुलाजवळ पुराच्या पाण्याचा वेग अधिक आहे. त्यामुळे याठिकाणी उडी मारणे ही जिवाशी खेळण्यासारखे असते. पुराच्या पाण्यात पोहताना वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. नदीकाठावर प्रशासकीय यंत्रणेमार्फत नियंत्रण नसल्याने, या घटनांमधून आणखी बळी जाण्याचाही धोका संभवत आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com