मच्छीमारांच्या प्रयत्नांना यश; भरकटलेल्या बाेटीस वाचविले

मच्छीमारांच्या प्रयत्नांना यश; भरकटलेल्या बाेटीस वाचविले
boat

रत्नागिरी : दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनारी आज (साेमवारी) सकाळी पुन्हा एक बोट भरकटली. दरम्यान या पाच सिलेंडरच्या बोटीचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या बोटीला वाचवण्यासाठी स्थानिक मच्छीमार आणि नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यश आले. dapoli-boat-sinks-rain-update-ratnagiri-sml80

ही बोट गाळात रुतली हाेती. त्यामुळे या बाेटीस जलसमाधी मिळते की काय अशी भीती निर्माण झाली हाेती. दरम्यान स्थानिकांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी धाव घेतली. बाेट बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे बाेटीतील लाेक बचावले.

boat
कष्टकरी जनतेच्या लढ्यात डाॅ. गेल ऑम्व्हेट कायम अग्रभागी असतं

साेमवारी आंजर्ले समुद्रात दोन बोटींना जलसमाधी मिळाली होती. त्यापाठोपाठ पुन्हा आज (मंगळवार) सकाळी समुद्री उधाणाचा तडाखा बसून हर्णे समुद्रकिनारी एक बोट भरकटल्याने मच्छीमार बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com